सोशल मीडियावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या "अभि गडदे" या व्यक्तीवर अट्रोसिटी ऍक्ट अतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन...
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी आहे.बहुजन समाजातील अनुयायी मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात, जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, तसेच इतर जातीधर्माचे सण उत्सव देखील सुरु आहेत. अश्यातच काही विघ्नसंतोषी लोक महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान पसरवत आहेत ज्यामुळे समाजात असंतोष पसरत आहे. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याने दिसत आहेत. तरी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल युनियन मार्फत अशी मागणी करते की, गेल्या 8 दिवसात अंकलखोप येथील पांडुरंग सूर्यवंशी याने आक्षेपार्ह लिखाण केले होते त्यालाच धरून त्याचाच सहकारी "अभि गडदे " राहणार बुर्ली, तालुका पलुस, जिल्हा सांगली. याने देखील इंस्टाग्रामवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे तरी त्याच्यावर तात्काळ अट्रोसिटी दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. तसेच सामाजिक सुरक्षा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुर्ख लोकांच्या मागे असणारे खरे सुत्रधार कोण आहेत ते शोध घेऊन त्यांचा कायदेशीर बंदोबस्त करावा. एकाच तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळे
समाज घातक वृत्तीचा विशेष पोलीस नियंत्रण द्वारे तपास करावा अन्यथा आंबेडकरी, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आशा प्रवृत्तीच्या
मानसिकतेला धडा शिकवावा लागले याची नोंद घ्यावी.
होणाऱ्या नुकसानीला पोलीस प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी.असे निवेदन द्वारे कळविले आहे.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे,शहर अध्यक्ष पवन वाघमारे, विकास भिसे,ऋषिकेश माने,अप्पालाल राजरत्न, हिरामण भगत, रतन तोडकर, नितीन सरोदे, आकाश बनसोडे, सूनकाप्पा मद्रासी, युवराज कांबळे,बंदेनवाज राजरत्न, मोहन साबळे, विक्रांत गायकवाड, दादासो कांबळे, अतुल कांबळे,मेघराज कांबळे यांच्या बरोबर बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.