लोकशाही वाचवण्यासाठी 'भारताचे संविधान' प्रतींची भेट.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पृथ्वीराज पाटील यांचा उपक्रम*
देशातील आजची एकूण परिस्थिती लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या 'भारताचे संविधान' या पुस्तकाची नितांत गरज आहे, आणि म्हणूनच डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी ठिकठिकाणी जाऊन 'भारताचे संविधान' हे पुस्तक भेट दिले. या उपक्रमाचे विविध संस्था आणि व्यक्तिंकडून कौतुक होत आहे.
भारतीय राज्य घटनेने देशास लोकशाही व्यवस्था दिली. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये भारतीय राज्यघटनेने दिली. सर्वांना मतदानाचा अधिकार देवून देशात ख-या अर्थाने रयचे राज्य स्थापन केले. समान संधी आणि समान न्याय आपली राज्यघटना देते. राज्यघटनेमुळेच सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला असून घटनेमुळेच सर्व मानवी मूल्यांचे संरक्षण होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपणांस राज्यघटना मिळाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मध्यवर्ती समिती, शाहु, फुले विचार मंच कुपवाड, त्रिमुर्ती रिक्षा स्टॉप मंडळ, रमामातानगर मित्र मंडळ, जय भीम व्यायाम मंडळ, प्रशिक चौक कला, क्रीडा मंडळ, श्री संत रोहिदास नगर मित्र मंडळ, सिध्दार्थ व्यायाम मंडळ, शांतीनगर व्यायाम मंडळ, भिमगर्जना मंडळ, आलिशान कॉलनी, सरकार ग्रुप कुपवाड, लक्ष्मी मंदीर चौक, भीमसेना मंडळ यशवंतनगर, सांगली बौध्द धर्म संघ, संजयनगर, शिवशंकर युवा प्रतिष्ठान, अण्णाभाऊ साठे मित्र मंडळ, चक्रवर्ती सम्राट अशोक ग्रुप राजश्री शाहु कॉलनी, क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले विचार मंच, महात्मा फुले फौंडेशन, डॉ. मेहता रिक्षा स्टॉप मित्र मंडळ, भिम प्रतिष्ठान पद्माळे, जयभिम तरूण मंडळ कर्नाळ, प्रशिक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बिसुर, संघर्ष कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ व पंचशिल महिला मंडळ, माधवनगर, सम्राट अशोक चौक, एस ए सी फ्रेंड सर्कल आदि 42 ठिकाणी संघटना, मंडळे व समित्या यांना राज्यघटनेची प्रत श्री. पाटील यांनी भेट म्हणून दिली आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.
राज्यघटनेची प्रत वाटप करीत असताना ते म्हणाले, या संविधानाचे सामुहीक वाचन व्हावे ज्यामध्ये मुले, तरूण, वरिष्ठ या सर्वांनी सहभाग नोंदवावा.
आज देशामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
केंद्रातील सरकारमधील लोक सत्तेसाठी वाट्टेल ते करत आहेत, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावून नामोहरम केले जात आहे. भ्रष्टाचार आणि महागाई प्रचंड वाढली आहे, सध्या देशात संविधानाची उलट वाटचाल सुरू आहे. अशा काळात भारताचे संविधानच देशाला वाचवू शकते त्यामुळे देशातील संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. अशा भावना पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केल्या.
यावेळी नगरसेवक अभिजित भोसले, मंगेश चव्हाण, रविंद्र वळवडे, संपत भगत, अनिल पाटील, सनी धोतरे, आशिष चोधरी, अर्जुन मजले, मनोज लांडगे, रविकांत घोडके, शेवंताताई वाघमारे, अरविंद पाटील, राजेंद्र कांबळे, प्रशांत अहिवळे, आकाश तिवडे, सचिन कांबळे, विक्रम कदम, संध्या कांबळे, सुधीर कांबळे, रणजित चव्हाण, सागर इंगळे, आनंद कांबळे, नितीन वराळे, मारूती कांबळे, अशोक साबळे, डॉ. सुधिर कोलप, संजय शिंदे, मंगेश खरात, अनिल कांबळे, राजू गाडे, विशाल कांबळे, अजय कांबळे, स्नेहल कांबळे, अमित कांबळे, शोभा कांबळे आदि उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.