काँग्रेसच्या जय भारत सत्त्याग्रहात मोदी सरकारवर हल्लाबोल: चौक सभांतून जनजागृती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या जय भारत सत्त्याग्रहात मोदी सरकारवर हल्लाबोल: चौक सभांतून जनजागृती
काँग्रेसच्या जय भारत सत्त्याग्रहात

मोदी सरकारवर हल्लाबोल:  चौक सभांतून जनजागृती

सांगली, दि. १५ :
जयभारत सत्याग्रह अंतर्गत सांगली शहर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने दररोज चार चौक सभा आयोजित करून प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे . सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सभा घेण्यात येत आहेत


दि १३ रोजी सांगली शहरातील संजयनगर रिक्षा स्टॉप, नवीन वसाहत टिंबर एरीया, भोला मोडिकल चौक, वडारवाडा, लक्ष्मी देऊळ ( हडको कॉलनी ) या ठिकाणी सभा घेण्यात आल्या.


या चौकसभामधील समन्वयक कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाविरोधात हल्लाबोल केला. हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून  परदेशात पळून गेलेल्या लोकांना कुणाचा पाठिंबा आहे हे आता लपून राहिलेले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. गौतम अदानी यांच्या आर्थिक भानगडींची जेपीसी मार्फत चौकशी करावी अशी विरोधी पक्षांनी मागणी केली आहे, परंतु सभागृहात गोंधळ घालून सत्ताधारी लोक त्यापासून पळ काढत आहेत, असा आरोपही या समन्वयकांनी केला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या सर्व प्रकरणांवर आवाज उठवल्यामुळेच त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे, परंतु अशाने त्यांचा आवाज दबला जाणार नाही, सारा देश त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी आहे, असेही या वक्त्यांनी म्हटले आहे.


चौकसभांचे नियोजन जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णाताई पाटील , ब्लॉक अध्यक्ष आणि सभा समन्वयक बिपिनदादा कदम, शहर जिल्हा संघटक आशिष कोरी, माजी नगरसेवक करीमभाई मेस्त्री, महादेव साळुंखे, ईलाही बारूदवाले , सहकार सेलचे सरचिटणीस ॲड. भाऊसाहेब पवार , वक्ता सेलचे प्रदेश सचिव शरद चव्हाण , शिक्षक सेलचे प्रा. एन. डी बिरनाळे , माजी नगरसेवक अल्ताफ पेंढारी, नंदकुमार शेळके, समन्वयक अमित पारेकर , शहर जिल्हा सचिव मौला वंटमोरे , अर्जुन मजले, अजय देशमुख, संतोष भोसले आणि कार्यकर्त्यांनी केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली
---