अवैध धंदे बंद करा, अन्यथा युवासेना उदध्वस्थ करेल सचिन कांबळे; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

अवैध धंदे बंद करा, अन्यथा युवासेना उदध्वस्थ करेल सचिन कांबळे; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार...




लोकसंदेश प्रतिनिधी सांगली

अवैध धंदे बंद करा, अन्यथा युवासेना उदध्वस्थ करेल
सचिन कांबळे; मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे तक्रार करणार...

सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांनी पुन्हा डोके वर काढले आहे. छुप्या पद्धतीने मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. बेटिंग सुरू आहे. व्हिडीओ गेम, ऑनलाइन कसिनो मोबाईलवर चालू आहे बेकायदेशीर दारू विक्री, सावकरकीचे स्तोम माजले आहे. पोलिसांनी या अवैध धंद्यांचा बंदोबस्त करावा,



अन्यथा शिवसेना युवसेनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 'टास्कफोर्स' तयार करून अवैध धंदे उदध्वस्थ केले जातील असा इशारा युवासेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे यांनी दिला आहे. दरम्यन पोलिसांनी वेळेत कारवाई न केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करू असा इशाराही कांबळे यांनी दिला आहे..


कांबळे म्हणाले, जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यानी पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले होते. मात्र आता छुप्या पद्धतीने पुन्हा अवैध व्यावसायिक सक्रिय झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मटका, जुगार, बेकायदेशीर दारू विक्री सुरू आहे. आयपीएल सामन्यावर मोठया प्रमाणावर बेटिंग सुरू असल्याची चर्चा आहे. व्हिडिओ पार्लरसह अन्य अवैध धंदे वाढले आहेत.



पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत.
त्यामुळे अवैध धंदे कमी होण्याऐवजी फोफावले आहेत. यातून गन्हेगारी वाढली आहे. तरुण, शाळकरी मुले व्यसनाधीन झाली आहेत. वाम मार्गाकडे वळू लागली आहेत. अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय होत आहेत. काही दिवसांपूर्वी साखर कारखाना परिसरात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा रागाने बघितल्याच्या क्षुल्लक कारणावरून खून करण्यात आला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या सर्वांचे मूळ अवैध धंदे आहेत. पोलिसांनी तातडीने अवैध धंदे बंद करावेत. अन्यथा युवसेनेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 'टास्कफोर्स' तयार करून अवैध धंदे उद्धवस्त करू असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.




-----

मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार..

जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा. मटका, जुगार अड्डे उधवस्थ करावेत. अन्यथा युवासेना स्टाईल ने अवैध व्यावसाय बंद करू. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सचिन कांबळे जिल्हाप्रमुख युवा सेना यांनी लोकसंदेश शी बोलताना सांगितले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.