सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर साहेब यांचा आज सांगली जिल्हा दौरा संपन्न

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर साहेब यांचा आज सांगली जिल्हा दौरा संपन्न
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी

सांगली जिल्हा संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर साहेब यांचा आज सांगली जिल्हा दौरा संपन्न


 शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी बैठकी नंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की , मी विश्वासाने सांगतो की हेच नाही तर पुढची पाच वर्षेबही एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील , एक चांगला नेता महाराष्ट्राला मिळाला आहे. पुढच्या काळात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालेला आपल्याला दिसेल असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला

 यावेळी क्षीरसागर  यांनी सांगली जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता चांगलाच चर्चेत आला आहे . त्याविषयी बोलताना ते म्हणाले, सातारा , कोल्हापूर , सांगली अशा तिन्ही जिल्ह्यांचा हा प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 600 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे , तशाच पध्दतीने सांगली जिल्ह्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त निधी मंजूर करून प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावता येईल . पुढच्या काळात 
महापुराच्या वेळी मदत देण्यासाठी सांगलीत हवाई धावपट्टी उपलब्ध नाही त्याबद्दल ते म्हणाले यावर लवकरच निर्णय घेतला जाईल.

       शहरी  एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलतीची मागणी होत आहे त्याबद्दल बोलताना क्षीरसागर साहेब म्हणाले , हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे , त्यांच्या याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. या वेळी माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार, महेंद्र भाऊ चंडाळे, उपजिल्हाप्रमुख माधवराव गाडगीळ, नंदकिशोर नीलकंठ, युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, आकाश माने, महिला आघाडी रुक्मिणी आंबिगिरे, तालुका प्रमुख सागर मलगुंडे, महादेव सातपुते, प्रशांत लेंगरे, प्रदीप कदम, शहर प्रमुख संदीप ताटे, किरणसिंह रजपूत, शहर संघटक गजानन मोरे, किरण कांबळे, सारंग पवार, आबा कोळी, रोहन वाल्मिकी, नरेंद्र बनसे इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.