जळगांव पाचोरा येथील श्री शिव पुराण महा कथा निमित्त महिलांनी काढलेली कलश यात्रा याचे पावसाच्या आगमनाने स्वागत

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगांव पाचोरा येथील श्री शिव पुराण महा कथा निमित्त महिलांनी काढलेली कलश यात्रा याचे पावसाच्या आगमनाने स्वागत
जळगांव:पाचोरा येथील श्री शिव पुराण महा कथा निमित्त महिलांनी काढलेली कलश यात्रा याचे पावसाच्या आगमनाने स्वागत

लोकसंदेश जळगाव जिल्हा प्रमुख शेख जावीद

पाचोरा येथील श्री कैलास देवी मंदिर च्या बाजूला असलेले सावा मैदान येथे श्री शिव पुराण महा कथा आयोजित केलेली असून 30 एप्रिल ते सहा मे पर्यंत परमपूज्य श्री पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे शिष्य परमपूज्य पंडित श्री संजयजी शर्मा यांचे श्री महापुराण कथा आयोजित केलेले आहे त्यानिमित्त पाचोरा शहरातील सर्वधर्मीय महिला यांनी एकत्रित येऊन भव्य अशी कलश यात्रा कोंडवाडा गल्लीतील पांचाळेश्वर मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्याचे सुरुवात केली होती त्यावेळेस साक्षात श्री शंकर भगवान यांनी फक्त दहा मिनिटा करता पावसाने सुरुवात करून त्यांचे स्वागत केले महिलांनीही पावसात डोक्यावर कळस घेऊन उभे राहिले होते व त्यांनी त्या पावसात आनंद व्यक्त केला संपूर्ण शहरात दहा मिनिटांसाठी पावसाचे आगमन झाले असता संपूर्ण रस्ते स्वच्छ झाले व त्या रस्त्यावरून श्री शिव महापुराण कथा या जागेवर जाण्यासाठी महिलांनी डोक्यावर कळस घेऊन जामनेर रोड मार्ग श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक भुयारी मार्ग भडगाव रोड येथून सावा मैदान येथे पर्यंत सर्व महिलांनी पायी चालून कळस यात्रा काढली होती ह्या कळस यात्रेच्या महिलांचे स्वागत ठीक ठिकाणी करण्यात आले यावेळी शहरातील अनेक मान्यवर यांनी हजेरी लावून कळस यात्रेतील महिलांचे व महाराजांचे जंगी स्वागत केले पाचोरा शहरात पहिल्यांदाच भव्य मोठा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी शहरातील सर्व नागरिक व महिला तसेच बालगोपाळ मंडळी यांनी येऊन श्री महापुराण कथा येथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा या कार्यक्रमाचे नियोजन आग्रवाल समाजातील कार्यकर्ते तसेच पत्रकार मंडळी व ग्रीन ॲपल यांनी आयोजित केला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली,