जळगांव:सोयगाव शेंदुर्णी रस्त्याची लागली वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते मुत्युची वाट लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जळगांव:सोयगाव शेंदुर्णी रस्त्याची लागली वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते मुत्युची वाट लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
लोकसंदेश जळगाव जिल्हा प्रमुख: शेख जावेद 

सोयगाव शेंदुर्णी रस्त्याची लागली वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहते मुत्युची वाट लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.


सोयगाव तालुका डोंगराळ व मागासलेल्या तालुका म्हणून सर्वदूर परिचित आहे. छत्रपती संभाजीनगर पासुन १२५ किलोमीटर तर जळगाव पासून ६५ किलोमीटर अंतरावर सोयगाव तालुका आहे. त्यात सोयगाव शेंदुर्णी रस्ताही दोन जिल्ह्यातील सिमाभाग आहे. सोयगाव पासुन फक्त चार किलोमीटर अंतरावर शेंदुर्णी (जि जळगाव) हद्द लागते.सोयगाव बायपास रस्ताची पुर्णपणे चाळणी झाली आहे. तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ताचे डाबरी करण सुरू केले होते मात्र सिगल रेल करुन रस्त्याच्या बाजूला मातीच्या भराव करुन ठेकेदार गायब झाले आहे.मराठवाडाची-खान्देशाची सीमेवर सोयगाव शेंदुणी हा अवघ्या ७ किलोमीटरचा रस्ता आहे.या सात रस्त्याचे काम जवळपास तीन महिन्या पासून संथ गतीने सुरू आहे.हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून त्या रस्त्याने वापरतांना प्रवाश्याना पाठ ,कमर,मणक्याचे आजार जडले आहेत. तसेच गर्भवती महिलां व आजारी रुग्णांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या साईडपट्टीसाठी मुरूमाएवजी शेतातील काळी मातीचा सर्रास वापर होत आहे. हा रस्ता एका वर्षात वाहुन जाण्याची शक्यता आहे.लोकप्रतिनिधिंचे दुर्लक्ष सोयगाव येथील लोक या रस्त्याच्या कामाचे काही एक देणे घेणे नसल्याचा प्रत्यय सर्वसामान्य जनतेला येत आहे.या कामाकडे लोकप्रतिनिधीना लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने हा रस्ता अतिशय निकृष्ट व दर्जाहीन होत आहे. भवानी मंदिराच्या बाजूला बायपास जवळ ५० ते ६० मीटर रस्ता खुपच खराब झाल्याने नागरिकांना धुळीचा सामना करीत वाहन चालवावे लागत आहे. रस्तावरील दगड - गोटे लागुन आतापर्यंत बरेच नागरिक किरकोळ अनेक जन जखमी झाले आहेत.संत गाडगेबाबा चौक ते भवाणीमाता रस्ता (बायपास) वर दर दोन वर्षाला लाखोंची मलमपट्टी करण्यासाठी शासनाकडून लाखों रुपये खर्च करण्यात येत असतात यात ठेकेदार वरच्यावर कामे करुन मार्चमध्ये बिले उचलून मलिदा लाटत आहे. शहरातील व्यावसायिक व्यापारी मंडळीसाठी सोयगाव-शेंदुर्णी रस्ता महत्त्वाचा दुवा आहे.मात्र राज्यकर्ते व सा. बा. विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने व्यावसायिक व्यापारी जनतेत रोष निर्माण होत आहे.कोट १सोयगाव शेंदुर्णी रसस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले असुन आम्ही दहा लाख रुपयांचे घर बांधून काही फायदा झाला नाही तसेच धुळीमुळे लहान मुलांना बाहेर ही खेळता येत नाही.घरात आजाराचे प्रमाण वाढले आहे.गेल्या तीन महिन्यापासून ठेकेदार काम बंद करुन गायब झाला आहे गोविंद विजय आहिरे रहिवासी नारळीबाग सोयगाव कोट २ सोयगाव बायपास रस्त्याचे कामंयेत्या आठ दिवसात न झाल्यास महाराष्ट्र नव निर्माण सेनेतर्फे सोयगाव शेंदुर्णी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. मनसे तालुका अध्यक्ष रामा एलिस यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितले आहे.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.