सातारा:वाईतील दिलीप गुळुंबकर यांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार ..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:वाईतील दिलीप गुळुंबकर यांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार ..



लोकसंदेश न्यूज वाई प्रतिनिधी 

सातारा:वाईतील दिलीप गुळुंबकर यांचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 
यांच्या हस्ते सत्कार ..

वाई शहर हे विविध कला गुणांचे केंद्र म्हणून संपूर्ण राज्यात त्याचा नावलौकिक आहे .येथील  सोनगीरवाडीतील रहिवासी असलेले 
दिलीप गुळुंबकर या नामवंत चित्रकाराने  जिल्ह्याचा कलारत्न पुरस्कार पटकावला हे त्यांच्या कतृत्वाची पावती आहे .अशा 
कलाकाराचा माझ्या हस्ते सत्कार होतोय हि माझ्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे .असे गौरव उदगार राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले .या 
वेळी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ.सुरेश जाधव पक्ष निरिक्षक श्रीरंगनाना .सातारा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सौ.अल्पनाताई यादव .वाई तालुक्यातील ऊद्योजक आणी रवीऊदय पतसंस्थेचे संस्थापक प्रताप यादव आणी प्रचंड संख्येने  
कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते .
वाई शहरातील  सोनगीरवाडी येथील रहिवासी असलेले दिलीप गुळुंबकर हे चित्रकलेचे गाठे अभ्यासक म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत  .आपल्या कलेशी एक निष्ठ राहुन ते आपला छंद जोपासत असतानाच त्यांच्या या कलेची दखल सातारा जिल्हा चित्रकार व कलाकार या नामवंत संघटनेने घेऊन त्यांना कलारत्न पुरस्कार देवून दिलीप गुळुंबकर यांचा यथोचित सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले.दिलीप गुळुंबकर हे वाई शहरासह सातारा जिल्ह्यात ऊकृष्ठ चित्रकार म्हणून नावलौकिक प्राप्त आहेत .कुठलेही कसलेही चित्र ते सहज पणे काढणे आणी त्या चित्रात सजीवपणा आणण्या साठी 
व ते चित्र जणू आपल्याशी काही तरी बोलतय असा भास त्या चित्राकडे पाहिल्यावर चित्र रसिकांच्या मनात सदैव डोकावत असते .
दिलीप गुळुंबकर हे गेली कित्येक वर्षा पासून चित्रकलेच्या या  क्षेत्रात 
आपल्या दोन्ही  हातांच्या हातोटीने आजच्या धावत्या आणी स्पर्धेच्या  युगात दिवसें दिवस जिवंतपणा असणारी व लोप पावणारी चित्रकला हि जिवंत ठेवण्या साठी त्यांचे सुरु असलेले प्रयत्न आणी कष्ट आजच्या नवीन पिढी समोर एक आदर्शच आहे .

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई