लोकसंदेश न्यूज वाई प्रतिनिधी
काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी तयारीला लागावे... माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण..
वाई तालुका काँग्रेस कमिटीची बैठक बुधवार दि. २४ मे रोजी हॉटेल धनश्री येथे संपन्न झाली.यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्या साठी तयारीला लागावे असे आवाहन त्यांनी बोलताना केले .
वाई तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. विलास (बापू) पिसाळ यांनी आ.पृथ्वीराज बाबांच्या आदेशा नुसार शहाभाग फाटा येथील हॉटेल धनश्री येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती .
या बैठकी मध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की कर्नाटक मध्ये काँग्रेसला मिळालेला एक हाती विजय ही देशवासीयां साठी आनंदाची घटना आहे. संविधान वाचावं आणि ह्या देशातील लोकशाही बळकट व्हावी अशी ज्यांची इच्छा आहे अशा सर्व लोकांनी कर्नाटक मध्ये काँग्रेसला भरभरून मतदान केले. गेल्या निवडणुकी पेक्षा काँग्रेसचा या निवडणूकी मध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे.भाजपने कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा शहरी भाग वजा करता भाजपला ग्रामीण भागामध्ये कुठेही फारसे यश मिळताना दिसले नाही. याचा अर्थ भाजप विरोधी वातावरण देशांमध्ये निर्माण व्हायला लागले आहे त्याचाच परिणाम महाराष्ट्रा मधील राजकारणावर सुद्धा होणार आहे. याचा विचार करून काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था,विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकां साठी तयारीला लागायचे आहे.यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित बैठक घेऊन आपले उमेदवार कसे असावे आपला स्थानिक अजेंडा काय असावा या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पिसाळ यांनी स्वागत केले सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष ऍड.प्रताप सिंह देशमुख यांनी प्रस्तावित केले जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव जिल्हा प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण सरचिटणीस नरेश देसाई यांनी आपले मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले. जिल्हा चिटणीस अतुल संकपाळ यांनी आभार मानले. बैठकीला सुरुवातीला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वागत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पिसाळ यांनी केले त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग नाना चव्हाण यांचे स्वागत जिल्हा चिटणीस अतुल संकपाळ यांनी केले.
बैठकीला सेवा दलाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पिसाळ,जिल्हा सदस्य मंजिरीताई पानसे,वाई विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सचिन काटे, जिल्हा युवक उपाध्यक्ष विहार पावसकर,वाई शहर युवक चे अजिंक्य देशमुख, वाई शहर कार्याध्यक्ष आकाश पोळ, महेश ढगे, किशोर पाटील, हनुमंत दादा पिसाळ, बाबासाहेब पिसाळ, प्रकाश शिंदे, काशिनाथ कांबळे, रामभाऊ पिसाळ, राजू गायकवाड, हणमंत पिसाळ, फैयाज बागवान,अन्सार मुजावर, ऍड.समीर मुजावर, प्राज्ञपाठशाळा चे श्री.अनिलजी जोशी साहेब,श्री.मोने साहेब आणि वाई तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई