आजपासून युवासेना नशेचे अड्डे उद्ध्वस्त करणार सचिन कांबळे; पोलीसांची कारवाईस टाळाटाळ संशयास्पद ; प्रत्येक तालुक्यात टास्क फोर्स तयार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आजपासून युवासेना नशेचे अड्डे उद्ध्वस्त करणार सचिन कांबळे; पोलीसांची कारवाईस टाळाटाळ संशयास्पद ; प्रत्येक तालुक्यात टास्क फोर्स तयार




सांगली / प्रतिनिधी

आजपासून युवासेना नशेचे अड्डे उद्ध्वस्त करणार
सचिन कांबळे; पोलीसांची कारवाईस टाळाटाळ संशयास्पद ; प्रत्येक तालुक्यात टास्क फोर्स तयार

सांगली, मिरज शहरामध्ये रोज खुलेआम नशेच्या गोळ्या, औषधे, इंजेक्शनची विक्री होत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. तरीही कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.  युवा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आठ शिवसैनिकांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने आज पासून नशेचे अड्डे उद्ध्वस्त करणार आहे, अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सचिन कांबळे यांनी दिली. 
   कांबळे म्हणाले, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निष्काळजीपणामुळे युवा पिढी नशेच्या आहारी गेली आहे. खून, खुनाचे प्रयत्न, मारामारी सारख्या घटनांना उत आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी नशेखोर असल्याचे तापसमध्ये समोर येते. तरीही नशेच्या गोळ्या, औषधे, इंजेक्शन विक्री करणाऱ्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. अवैध धंदे तर खुलेआम सुरु आहेत. याबाबत युवासेनेच्या वतीने जिल्हापोलिस प्रमुख यांची भेट घेत पुराव्यासह तक्रार केली होती. त्यांनीही कारवाईची ग्वाही दिली होती.
    चार दिवसांपूर्वी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर सांगली दौऱ्यावर आले होते. नशेच्या गोळ्या, इंजेक्शन विक्री करणार्यांवर कडक कारवाई करावी. युवा पिढी कोण बरबाद करत असेल तर खपवून घेणार नाही असा इशारा पोलिस व अन्न व औषध प्रशासन विभागाला दिला होता. तरीही कारवाई होताना दिसत नाही. पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यांच्याकडून कारवाई होत नसल्याने आता युवा सेनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात आठ शिवसैनिकांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीने नशिल्या पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.