काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील..... कर्नाटकच्या प्रचार रणधुमाळीत...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील..... कर्नाटकच्या प्रचार रणधुमाळीत...काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील
कर्नाटकच्या प्रचार रणधुमाळीत
गावागावात बैठका, मतदारांचा चांगला प्रतिसाद

सांगली, दि. ५ : कर्नाटक येथे सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीत सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री पृथ्वीराज हेही उतरलेले आहेत. चिकोडी- सदलगा विधानसभा मदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज ठिकठिकाणी बैठका घेतल्या.


या मतदारसंघातील अनेक गावात जाऊन श्री. पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.


काँग्रेस पक्षाशिवाय कर्नाटक राज्याला पर्याय नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने महागाई प्रचंड प्रमाणात वाढवलेली आहे. त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे काँग्रेसलाच येथे निवडून द्यावे ते चांगला कारभार करून दाखवतील असा विश्वास ही श्री. पाटील यांनी मतदारांच्या समोर बोलताना व्यक्त केला.


ते म्हणाले, कर्नाटकात सर्वत्र काँग्रेससाठी निवडणुकीत अनुकूल वातावरण आहे. भाजप सरकारच्या कारभाराला इथले लोक कंटाळलेले दिसतात, त्यामुळे बहुमताने काँग्रेसच सत्तेवर येईल याबाबत कुठलीच शंका नाही.


अनेक ठिकाणी लोकांनी श्री. पाटील यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.