लोकसंदेश सातारा जिल्हा प्रमुख
दौलतराव पिसाळ
वाई तालुक्यातील खानापुर गावात मिरवणूकीने श्री गणेश. विठ्ठल रुक्मिणी. आणी लक्ष्मीमाता मुर्तींचे
आगमन .
खानापुर गावात ग्रामपंचायत सोसायटी आणी गाव सहभागातून
तब्बल १५ लाख रुपयांची वर्गणी
गोळा करुन श्री गणेश .श्री लक्ष्मीमाता. आणी श्री विठ्ठल रुक्मिणी .या देवी देवतांनच्या मुर्त्या
आणुन त्यांना पाच पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ओझर्डे सोनेश्वर येथील पवित्र कृष्णा नदीच्या घाटावर दहीदुध आणी पंचमृतासह फळे फुले वाहुन अभिषेक करुन विधीपुर्वक मंत्रपठण करुन या चारही मुर्तींना खानापुर गावच्या हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला. तरुणी. तरुणवर्गासह गाव कारभारी आणी ग्रामस्थांनच्या साक्षीने गंगास्नान घालण्यात आले .गंगास्नान झाल्या नंतर या चारही मुर्तींची फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधुन पारंपारिक ढोल ताशांच्या निनादात भव्य अशी मिरवणूकीने गाव प्रदर्शना घालण्यात आली .
खानापुर या गावातील प्रत्येक घरा समोर पारंपारिक पद्धतीने व शुभ कार्या साठी पवित्र समजले जाणारे शेणाचा सडा आणी त्यावर आकर्षित करणारी विविध रंगांनी साजवलेल्या रांगोळ्या पहावयास मिळत होत्या .गावातील घरा घरातील प्रत्येक भगिनी आपल्या अंगणात आलेल्या श्री गणेश. श्री विठ्ठल रुक्मिणी .श्री लक्ष्मीमाता. यांची मनोभावे पूजा करण्या साठी हळद कुंकू आणी आरतीच्या ताटात निरंजन घेवुन पुजा करताना दिसत होत्या .या मुर्तींच्या पुढे मिरवणूकीत असंख्य महिलां भगिनींच्या डोईवर कलशाची घागर तर काहींच्या डोईवर तुलशी कलश पहावयास मिळत होते तर गावच्या घरा घरातील प्रत्येक तरुणी ही डोक्याला मर्दानी फेटा बांधून शातृक्त पद्धतीच्या जरी काटांच्या काष्टा घालून साड्या नेसून हातात हजारो ग्रामस्थांनच्या साक्षीने पार॔पारीक लेझीम घेऊन मिरवणूकीत लेझीमचा खेळ खेळत हि मिरवणूक पुढे पुढे सरकत होती .हजारो महिला आपली मुलगी ऊकृष्ठ लेझीम खेळते .व फेटा आणी आकर्षक रंगाच्या साडीच्या काष्ट्यात सिनेमातल्या नटी पेक्षा किती शोभुन दिसते मुलींच्या या देखणे पणाच्या आनंदात अनेक माता भगिनींनसह बापदादांच्या अश्रुंचे बांध फुटले .
वाई तालुक्यातील खानापुर हे गाव शेतकर्यांचे कष्टाचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त आहे . अशा या गावातील ग्रामपंचायत गावकारभारी
आणी ग्रामस्थांनी एकत्रीत येवुन ग्रामसभेचे आयोजन करुन त्यात विषय मांडला कि आपले खानापुर गाव सदन आहे . प्रत्येका कडे भरपुर पैसा आणी युक्ती आहे . प्रतिकार करण्या एतपत शरिरात शक्ती आहे .पण या युक्ती आणी पैसा व शक्तीला एकत्रीत संभाळून ठेवण्यासाठी त्याला धार्मिकतेची जोड असल्यास गावच्या घरा घरात समृध्दी नांदेल .त्या साठी आपल्या गावात श्री गणेश .श्री लक्ष्मी माता आणी श्री विठ्ठल रुक्मिणी या देवतांनच्या मुर्त्या नाहीत त्या जर आपण घरटी वर्गणी गोळा करुन या देवतांची मंदिरे बांधून देव देवतांनची प्रतिष्ठापना केल्यास गावाचा कायापालट होईल धार्मिक शक्ती ही
ज्या गावात असेल त्या गावातील प्रपंच हे भरभराटीने समृध्द झालेले दिसतील .आणी गावाने एक मुखी निर्णय घेवुन घरटी वर्गणी काढून तब्बल १५ लाख रुपये गोळा करुन
वरील चारही मुर्ती गावात आणुन
गावाच्या वैभवात भर घालुन परमेश्वरा पेक्षा कोणी मोठा नसतो तर परमेश्वराची शक्ती मोठी असते आणी त्या शक्तीच्या आशिर्वादावर
खानापुर गाव पुढील वाटचाल करताना नक्कीच दिशेल .पण हा आदर्श इतर गावांनी घ्यावा असा खानापुर गावचा हा एकीचा ठेवा आहे .
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.