सातारा:वाईतील बेलऐअर हॉस्पिटलला राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट .

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा:वाईतील बेलऐअर हॉस्पिटलला राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट .




लोकसंदेश न्यूज वाई,प्रतिनिधी

वाई तील बेलऐअर हॉस्पिटलला राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट .



इंडियन रेड क्रॉसक्रॉस सोसायटीचे महाराष्ट्र राज्याचे पदसिद्ध अध्यक्ष राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी अकरा वाजता वाई येथील पसरणी घाटाच्या पायथ्याशी नुकतेच उभारण्यात आलेल्या नूतन बेलएअर हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी फादर टॉमी व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.


राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वाईतील बेल एअर हॉस्पिटलला भेट देवुन तेथील शस्त्रक्रिया विभाग . अती दक्षता विभाग .लेबोरेट्री विभाग. सिटीस्कॅन एक्सरे विभाग  जनरल वार्डा बरोबरच  संपुर्ण हॉस्पिटलची पाहणी केली. येथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधाची माहिती घेतली.
 यावेळी जिल्हाधिकारी रुपेश रूचेस जयवंशी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, प्रांतधिकारी राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल जानवे खराडे,डिवाय एसपी 
केंद्रे  पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे .ऊप निरिक्षक वारुंज. के.डी.पवार  व पोलिस कर्मचारी   आदी मान्यवर उपस्थित होते.


    राज्यपाल रमेश बैस यांचे वाई येथील किसन वीर महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यावेळी  वाई- खंडाळा - महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.



    राज्यपाल बैस यांनी हॉस्पिटलला भेट दिल्या नंतर येथील  सोई सुविधा बाबत समाधान व्यक्त करून येथील हॉस्पिटल मध्ये शासनाची गोरगरिबांना उपयुक्त असणारी महात्मा फुले योजना लवकर सुरू करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले  . या वेळी जिल्हा  पोलीस दलाच्या वतीने  बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्राइव्हेट लिमिटेड मुंबई