लोकसंदेश न्यूज जळगाव प्रमुख प्रतिनिधी शेख जावेद
त्वरित रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर.... लोकसंदेश न्यूज प्रत्येक खड्यात वृक्षारोपण करणार.....
पाचोरा ते जामनेर महामार्ग क्रमांक १९ वर मागील तीन महिन्यांपासून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या अंदाजे साडेतीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशा चाळण झाली आहे. याबाबत वारंवार आवाज उठवला तरी ही आज पर्यंत या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कमालीचे दुर्लक्ष केले आहे.
तसेच ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी मते मागतांना गावागावात जाऊन चांगले रस्ते व इतर सुखसोयी देण्याची आश्वासने दिली होती त्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा या रहदारीला घातक ठरणाऱ्या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी संबंधित विभागाला सुचना केल्या नसल्याने अत्यंत निर्ढावलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नसल्याप्रमाणे "डोळे असून आंधळ्याची" भूमिका घेतली आहे.विशेष म्हणजे या रस्त्यावरुन अॅम्बुलन्स मधून रुग्णांना रुग्णालयात नेत असतांना रस्ता खराब असल्यामुळे दवाखान्यात नेण्यासाठी उशीर होतो तर अॅम्बुलन्स मधील रुग्णाला त्याच्या शारीरिक व्याधीपेक्षा जास्त त्रास या रस्त्यातील खड्ड्यांमुळे होतो व तेव्हा उपचारापेक्षा आजार बरा असे सांगून रुग्ण गाडी थांबवण्याची विनंती करतो असे अनुभव काही अंबुलन्स चालकांनी लोकसंदेश न्यूज कडे सांगितले आहेत.
तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस विभागासह अत्यंत तातडीच्या कामासाठी बाहेरगावी जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच एस. टी. बसने प्रवास करणाऱ्या व खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या रस्त्यावरुन प्रवास करतांना एस. टी. तील प्रवासी बसलेल्या आसनावरुन उठून उभे राहून प्रवास करणे पसंत करत आहेत.
म्हणून मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यानच्या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याची लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना याची जाणीव व्हावी म्हणून प्रसार माध्यमातून लवकरच "खड्डे चुकवा व बक्षीस मिळवा" ही फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी जामनेर तालुक्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे तारणहार मंत्री माननीय श्री गिरीशभाऊ महाजन यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याने त्यांची तारीख मिळताच स्पर्धेची तारीख निश्चित करण्यात येईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी ही विनंती.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली