राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी........

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी........
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती.

या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी,संघटनेतील सर्वच फ्रंटल सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहुन,या बैठकीमध्ये,देशाच्या,राज्याच्या,जिल्ह्याच्या,तालुक्याच्या,सामाजिक,आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.


या अनुषंगाने आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली "एक तास राष्ट्रवादी साठी " बैठक घेण्यात आली

बैठकीच्या सुरवातीला लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निम्मित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरजिल्हयाच्या वतीने अभिवादन करण्यात आले*


*यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने 'राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा.मा.शरदचंद्रजी पवार साहेब-एक राजकीय विद्यापीठ' या अनुषंगाने आदरणीय शरद पवार साहेबांच्या एकूण राजकीय,समाजिक,क्रीडा,शैक्षणिक अशा विविधांगी कार्यावर चर्चा करण्यात आली.*

त्याच बरोबर बैठकीत आदरणीय पवार साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने पवार साहेबांचा अभिनंदन व आभाराचा ठराव करण्यात आला.*
*यावेळी उत्तम कांबळे , असिफ बावा ,समीर कुपवाडे ,अनिता पांगम ,वैशाली कळके , छाया जाधव , आयुब बारगिर ,उमर गवंडी ,डॉ शुभम जाधव महालिंग हेगडे ,अर्जुन कांबळे , संगीता जाधव , सुरेखा सातपुते ,रुपाली कारंडे , विनायक हेगडे , संदीप दळवी , रामभाऊ पाटील, संजय सरवदे , प्रकाश सुर्यवंशी ,परवेज मुलाणी, कुमार वायदंडे ,युवराज नाईकवाडे ,अरुण चव्हाण ,विजय जाधव ,मुन्ना शेख, राजू पवार , राजू मुळके ,नितीन माने , आप्पासो ढोले , रुपेंद्र जावळे , फिरोज मुल्ला , अमीन शेख , जुबेर मुजावर ,अजित पाटील , संतोष कांबळे ,अभिजित रांजणे, अमित पाटील, सुमित कुंभोजकर , आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.