राष्ट्रवादीने बळकावलेल्या कार्यालय इमारतीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन.... जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आता आक्रमक ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीने बळकावलेल्या कार्यालय इमारतीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन.... जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आता आक्रमक ...




सांगली /इस्लामपूर लोकसंदेश न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीने बळकावलेल्या कार्यालय इमारतीसाठी कॉंग्रेसचे आंदोलन....

जागेच्या मुद्द्यावरून काँग्रेस कार्यकर्ते आता आक्रमक ...

चार दिवसांत या बाबतीत राष्ट्रवादीने निर्णय घेतला नाही तर मुंबईत खा. शरद पवार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसू ....असा इशारा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जिंतेंद्र पाटील यांनी दिला आहे 

 राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या २४ वर्षापासून ताबा घेतलेल्या इमारतीचा ताबा परत द्यावा या मागणीसाठी इस्लामपूरमध्ये कॉंग्रेसने बुधवारी ठिय्या आंदोलन केले. चार दिवसांत या बाबतीत राष्ट्रवादीने निर्णय घेतला नाही तर मुंबईत खा. शरद पवार यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसू असा इशारा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष जिंतेंद्र पाटील यांनी दिला.

कॉंग्रेसच्या कार्यालयाच्या इमारतीत २४ वर्षांपासून राष्ट्रवादीचे कामकाज केले जाते. महिन्याभरापूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इस्लामपूर मध्ये घेतलेल्या एका मेळाव्यात काँगेस आणि राष्ट्रवादी मध्ये या कार्यालयावरून वाद असल्याचे समोर आले. 

मात्र महिनाभर राष्ट्रवादीकडून कार्यालय सोडण्याबाबत काहीही हालचाल न झाल्याने आता या  इस्लामपूरमधील याच कार्यालयासमोर काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून काँग्रेसचे कार्यालय काँग्रेसच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.