लोकसंदेश वाई प्रतिनिधी-ओंकार पोतदार
कृष्णा खोरेच्या सेवानिवृत्त शिक्षकांनी संस्थेच्या कार्यास हातभार लाऊन डोंगरी ग्रामीण भागात ज्ञानदानाचे काम अखंडित ठेवावे असे उदगार साहित्यिक, कवी सुप्रसिद्ध वकील अँड उमेश सणस यांनी काढले.
महाबळेश्वर तालुका कोयना खोरे विकास मडळ मुंबई संचलित शिरवली(महाबळेश्वर) येथील कोयना खोरे विद्या विकास हायस्कूलचे मुख्याध्यापक पंढरीनाथ खाडे,उपशिक्षक ,विजय सावंत,शिक्षकेत्तर कर्मचारी भिमाजी मालुसरे,कोडीराम कांबळे,जि प मधील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ मोरे,विलास मोरे,संभाजी जाधव याचा सत्कार समारंभ, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शैक्षणिक साहित्यांचे वाटप असा एकत्रित कार्यक्रम प्रमुख पाहुणे अँड उमेश सणस यांचे शुभहस्ते व नोटरी अँड संजय बनकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे,सचिव गोविंद मोरे आदि मान्यवर उपस्थित होते.
अँड सणस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही प्रसंगाचे वर्णन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले व सर्व सत्कारमुर्ती यांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष मोरे यांनी शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन एकत्र यावे असे आवाहन केले.
यावेळी सचिव गोविंद मोरे,पत्रकार मर्ढेकर व सेवानिवृत्त शिक्षक,माजी व आजी विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे प्रतिष्ठान शिरवली यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तुंचे वाटप केले.प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर मालुसरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रास्ताविक सरचिटणीस गोविंद मोरे यांनी केले.नितीन कासुर्डे यांनी आभार मानले.सुत्रसंचालन शालेय सचिव शिवाजी मोरे यांनी केले.शेवटी मान्यवरांच्या शुभहस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमास शिरवलीतील मुंबईकर,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मिडीयम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. सांगली.