लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली जिल्हा माहिती अधिकारीपदी संप्रदा बीडकर
सरकारने जिल्हा
अधिकारीपदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
सांगलीत कार्यरत वर्षा पाटोळे यांची याच पदावर सातारा येथे बदली करण्यात आली आहे.
सांगलीत नियुक्ती मिळालेल्या संप्रदा बीडकर या मूळच्या विटा येथील आहेत. सध्या त्या बीड येथे कार्यरत होत्या. यापूर्वीही
बीडकर यांनी सांगलीत माहिती अधिकारी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून उत्तम काम केले आहे. जनसंपर्क आणि शासनाच्या योजना माध्यमांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
लवकरच त्या जिल्हा माहिती अधिकारीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.