इर्शाळवाडीवर दरड कोसळली, सोन्यासारखं गाव एका क्षणात उध्वस्त;.... तातडीने मदतकार्य सुरू

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

इर्शाळवाडीवर दरड कोसळली, सोन्यासारखं गाव एका क्षणात उध्वस्त;.... तातडीने मदतकार्य सुरू
लोकसंदेश न्यूज मीडिया रायगड खालापूर

इर्शाळवाडीवर दरड कोसळली, सोन्यासारखं गाव एका क्षणात उध्वस्त; अंगाचा थरकाप उडवणारे ....तातडीने मदतकार्य सुरू

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली असून तातडीने मदत कार्य व काम सुरू केलेले आहे
एका वसाहतीवर दरड कोसळून रात्रीच्या झोपेतच काही कळायच्या आतच अनेक जणांवर काळाने घाला घातला....


दरड दुर्घटनेत १२० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे.


मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतरतातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे या मध्ये लोकल तरुणांचा व रेस्कू टीम यांचा सहभाग घेतला 
आतापर्यंत ५ ते ६ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर २७ जणांची सुटका करण्यात आली आहे.


प्राथमिक माहितीनुसार ही ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे.

दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला आहे.मुख्यमंत्र्यांकडून इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा


        अदिती तटकरेंकडून रुग्णांची विचारपूसइर्शाळवाडीत दुर्घटनेत पावसामुळे बचाव कार्यात अडथळा; अजित पवार यांची माहिती      उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची प्रतिक्रिया

ही घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे. एनडीआरएफच्या 2 चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून आणखी दोन चमू थोड्याच वेळात पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे. प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत”, असंही फडणवीस म्हणाले....

LOKSANDESH NEWS MEDIA PRIVATE LIMITED MUMBAI.