संपादकीय.....
सांगलीत एसटीची टोलनाक्यास धडक.....
"मलई" देणाऱ्या टोलनाक्याची जाणून बुजून जपणूक.....
..
असं म्हणतात सांगली "बहुत चांगली" मात्र सांगलीची दैना झालेली कोणीही पहात नाही... यामध्ये सरकार, प्रशासन, व सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी असोत, सर्व पक्षाच्या नेत्यांनी फक्त सांगलीचा वापरच करून घेतलेला आहे..
त्यामुळे सांगलीची अधोगती होत आहे... आता या अधोगतीमध्ये सांगली मध्ये मोठमोठ्या वावड्या व अफवा उठवण्याचे काम सत्ताधारी व राज्यातील मोठे मोठे नेते करीत असतात (आता निवडणुका जवळ येत आहेत आता या वावड्या -आफवा आपणास भरपूर ऐकायला मिळतील)
सांगलीकरांच्या हातात फक्त "घंटाच" आहे
...परंतु सांगलीकरांच्या हातात फक्त "घंटाच" आहे आता ती घंटा काही सांगली शहराविषयी "अस्था" असणारे कार्यकर्ते वाजवण्याचे काम करतात ...पण सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधींच्यावर वर काही परिणाम होत नाही... असाच काहीसा प्रकार आता सांगली- इस्लामपूर रस्त्यावर सुरू आहे ...या दहा पंधरा वर्षात कोणाची सत्ता आली, कोण नेते मंत्री झाले, कोण मंत्री, कोणत्या पक्षाचे, नेते पालकमंत्री झाले, हे सर्व सांगलीकरानी पाहिले आहेत. सर्व पक्षांनी आपली आपली सत्ता भोगलेली आहे ...परंतु सांगली इस्लामपूर रस्त्याचा "सूर्य उजडायला तयार नाही" सांगली इस्लामपूर रस्त्यावर बऱ्याच वेळा नितीन गडकरी सारख्या केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा नारळ फोडला पण तो नारळ नारळच राहिला... सांगलीकरांच्या पदरात "नारळ" पडला... रस्त्यावरचे खड्डे, या रस्त्याची वाहतूक ,या रस्त्यासाठी हजारो वेळा लिहिलं गेलं... परंतु सरकार, लोकप्रतिनिधी, प्रशासनाला यामध्ये काहीही "हशील" नाही ...ही सर्व जण गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत.
सर्व पक्षाचे ,सर्व सत्ताधारी, विरोधी पक्ष, कधी ना कधी सत्तेमध्ये होते, या सर्वांनी सांगलीकरांची बोलवणच केलेली आहे, जे सत्तेत असतात ते काम करत नाहीत, जे विरोधात असतात त्यांनी फक्त दंगा करण्या पलीकडे काहीही केलेलं नाही, सांगली इस्लामपूर रस्ता असो, ड्रायपोर्टचा विषय असो, किंवा विमानतळाचा विषय असो, व इतर बरेच प्रश्न असो. .
आम्ही वारंवार म्हणतो सांगलीला एक वेळा खड्ड्यात घातल्यानंतर "हम हमारी झोली लेके हमारे हमारे गाव जायेंगे"...असे सगळे लोकप्रतिनिधी सांगलीकरांना लाभलेले आहेत, या सर्वांना सांगलीची "आस्था" नाही त्यांनी फक्त आपलं बस्तान बसवण्यासाठी सांगलीचा वापर करून घेतलेला आहे. त्यामुळे सांगलीकरांचे हे दुर्दैवच म्हणावं लागेल...
काल एस.टी चा अपघात झाला.. दैव कृपेने गंभीर जखमी कोणी झाले नाही... परंतु हे "जिजिया कर वसूल केलेली टोल नाके" आजपर्यंत सांगलवाडीला का ठेवलेला आहे ...याच काय "गौड बंगाल" सांगलीकर नागरिकांना कळालेलं नाही.. हा "छळणुकीचे प्रतीक" असलेला टोलनाका त्वरित हटवून सांगलीकरांना हा रस्ता मोकळा करून द्या अशी वारंवार मागणी "लोकसंदेश" च्या माध्यमातून आणि इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केलेली असताना सुद्धा हा टोलनाका का ठेवलेला आहे ? का परत "मलाई"साठी हा टोलनाका ठेवलेला आहे कळत नाही .... का तर नवा पूल बांधकाम सुरू आहे.. आणि त्या पुलावरून जाताना-यांना कडून कांहीं "मलाई"गोळा करायची आहे का?? असा एक संशय आता सांगलीकरांना येत आहे..
..तर या "मलईदार" शेडला त्वरित काढून सांगलीकरांना हा रस्ता मोकळा करावा अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे..
संपादक :
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली.
8830247886
LOKSANDESH NEWS MEDIA PRIVATE LIMITED MUMBAI.