स्वातंत्रसेनानी कै. बाबु बाळा नदाफ पिंजारी यांच्या पत्नी "आदर्श माता" हजानिमां श्रीमती जुबेदाबी बाबु नदाफ पिंजारी यांचा सत्कार सोहळा माननीय आमदार श्री अरूण आण्णा लाड यांचे हस्ते संपन्न...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

स्वातंत्रसेनानी कै. बाबु बाळा नदाफ पिंजारी यांच्या पत्नी "आदर्श माता" हजानिमां श्रीमती जुबेदाबी बाबु नदाफ पिंजारी यांचा सत्कार सोहळा माननीय आमदार श्री अरूण आण्णा लाड यांचे हस्ते संपन्न...





लोकसंदेश न्यूज मिडिया 

थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या पत्नी "आदर्श माता" हजानिमां
श्रीमती जुबेदाबी बाबू नदाफ यांचा गौरव सोहळा संपन्न.

माननीय आमदार श्री अरूण आण्णा लाड, विभागीय अधिकारी,पलुस माननीय श्री अजय शिंदे साहेब, माननीय तहसिलदार,पलुस श्री निवास ढाणे साहेब आणि समस्त बुर्लीकर बंधुभगिनीना 15 आँगस्ट 2023 स्वातंत्र् दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आईच्या सत्काराबद्दल हार्दिक आभार



दिनांक 15आँगस्ट 2023 रोजी आमच्या 104 वर्षिय वयोवृध्द आई व स्वातंत्रसेनानी कै. बाबु बाळा नदाफ पिंजारी यांच्या पत्नी श्रीमती जुबेदाबी बाबु नदाफ पिंजारी यांचा सत्कार सोहळा माननीय आमदार श्री अरूण आण्णा लाडजी, विभागीय अधिकारी, पलुस माननीय श्री अजय शिंदे साहेब, तहसिलदार,पलुस माननीय श्री निवास ढाणे साहेब यांचे हस्ते समस्थ बुर्ली ग्रामस्तांचे उपस्थितीत संपन्न झाला. 



आणि आठवणींचा उजाळा उर भरून उफाळुन आला. आमचे प्राणप्रिय वडील बाबु बाळा पिंजारी हे एक आदर्शवादी कुटुंब वत्सल व्यक्ती होते. त्या काळात जुनी सातवी बोर्ड परिक्षा पास होते.त्यांच्या कडुन व गावातील समकालिनांकडुन ऐकल्या प्रमाणे बुर्लीचे नेमु तात्या खोत, आनंदा कडोले, नाना मास्तर चौगुले, बापु संतु चौगुले, नाना मिठारी, ज्ञानदेव पाटील, दौला वाईंगडे,ज्योती कांबळे या सहकार्या समवेत भारतीय स्वातंत्र लढ्यात अखंड सहभागी होते.प्रसंगी तुरूंगवास ही सोसला होता.


 भुमीगत चळवळीत जीव जोखुन लढा दिलेला होता. भारत स्वतंत्र झालेवर शासनाकडुन सन्मानपत्र/ ताम्रपत्र आणि स्वातंत्र सैनिक पेन्शन ही सुरु झाली. या लढ्यात झोकुन दिल्यामुळे घराकडे दुर्लक्ष झालेच. अठरा विश्व दारिद्र होतेच. पेठेत वडिलांचे टेलरचे दुकान होते पण ध्यान स्वातंत्र लढ्यातच. अशा बिकट परिस्थितीत घराची बागडोर आमच्या आईने समर्थपणे पेलत आम्हा पाची भावाना जमेल तसे परिस्थितीजण्य शिक्षण दिले. 


आईवडीलाना त्या काळातही शिक्षणाचे महत्व कळुन चुकले होते. स्वातंत्र्यानंतर आमच्या मेहनती वडीलांनी टेलरिंग काम, काही काळ किर्लोस्कर कंपनीत काम, कृष्णा कोयना लिप्ट इरिगेशनचे काम, शेती करित आम्हाला यथायोग्य शिक्षण देत लहानाचे मोठे केले. थोरले भाऊ समसेर आणि रमजान किर्लोस्कर कंपनीत लागले. भाऊ रमजान हे राज्यपालाकडुन गुणवंत कामगार पुरस्कृत झाले व कंपनीकडुन इंग्लंड, जर्मनीत जाऊन आले. तिसरे भाऊ अमिर घाटगे पाटील उंचगाव कोल्हापुरला टेक्नीकल सुपरवायझर झाले. चौथे भाऊ वजीर म रा वि मंडळात लागले. या सर्वानी मला म्हणजे नसिरला उच्च शिक्षण दिले. पाचवीपासुन मला स्वातंत्रसैनिकांचा मुलगा असलेने दरमहा शिष्यवृत्तीही मिळाली. मी म रा वि मंडळात कोयना जल विद्युत केंद्र पोफळी येथे कनिष्ठ अभियंता ते उपकार्यकारी अभियंता झालो. आम्हा पाच भावांची सर्वांचीच मुले व नातवंडे ही उच्च शिक्षण घेऊन डाॅक्टर, इंजिनियर होत उच्च पदावर नोकरीस आहेत व काही व्यवसायात पण अग्रेसर आहेत.आमची आई, आम्ही भाऊ आणि आमच्या पत्नीसह हज यात्रा पण करून आलो आहोत. हे फक्त आणि फक्त आमचे वडिल स्वातंत्र सेनानी बाबु बाळा नदाफ पिंजारी आणि आई जुबेदाबी बाबु नदाफ पिंजारी यांच्या पुण्याईचे फळ आहे.

सर्वात महत्वाचे बुर्ली गाव हे कृष्णेच्या काठी असलेने महापुराचा तडाखा वारंवार बसतो. मी कोयना जलविद्युत केंद्रात कार्यकाळ असताना 2005,2019 चा महापुर हे तर अत्यंत विनाशकारी होते. 26जुलै ते आठ आँगस्ट 2005 ला कोयना परिसरात रोज 500-800 मिलिमिटर पाऊस पडत होता. बघताबघता धरण 105 टिएमसी भरले. पाणी सोडलेशिवाय ईलाज नव्हता. तिकडे अलमटी पण 123 टीएमसी भरले. पंचगंगेचे वेगवान पाणी कृष्णामाईच्या संथ पाण्यास सामावुन घेईना. कोयनेचे सहा दरवाजे 19फुट खुले करणेत आले. कृष्णा काठातील बुर्लीसह सर्व गावे महापुरात अडकली. मला वारंवार गावकरी, तलाठि, तहसिलदार, जिल्हाधिकारी, बिएस एन एल कडुन फोन आवरता नाकी नऊ येऊ लागले. दिलासा देणेही अवघड झाले. सगळा गाव रामानंदनगरला विस्थापित झाला.गावात मोजकीच लोक राहिले. तरीही माझे वयोवृध्द स्वातंत्रसैनिक वडील गाव सोडेनात. आमचा भाऊ समसेर सांगतो सकाळी महाराज उठले आणि चहा पान करुन बाहेर कट्टयावर बसले तसे बुडाला पाणी लागले. अरे शमु कट्टयावर पाणी मारलेस ते पुसले नाहीस व्हय लेका असे म्हणाले. त्यावेळी भाऊ समसेरने सांगितले आण्णा महापुराचे पाणी घरात शिरत आहे. तसे आण्णा हेलावले व मला वाडीवर घेऊन चला म्हणाले. आतापर्यंत संयमाने माझ्यावर विसंबलेल्या गावकर्याना आण्णाना वाडीवर नेत आहेत हे कळलेवर एकच कल्लोळ उडाला. कोयनेच्या साहेबानी आण्णाना हलवणेस सांगितलं याचा अर्थ आता काही गावाचे खरे नाही. हे समजुन आण्णासह नावेत एकदम धाव घेतली. आतापर्यंत सर्वांची संकटमोचक नाव पण हादरली व भार न पेलनेने पाण्यात आण्णा व गावकर्यासह बुडाली. सरपंच निवृत्ती पाटील व पंचमंडळी नी सर्वांची समजुत काढुन आण्णासह सर्वानाच सुखरूप वाडीवर पोहोचवले. पण दिनांक 07 आँगस्ट 2005 क्रांतीदिनी पहाटे थंड पाण्यात भिजलेने व हाय खाल्लेले 89 वर्षाचे आण्णा नसिरला बोलवा असे म्हणाले व आईच्या मांडीवर विसावले ते कायमचेच. बुर्ली व रामानंदनगर वासियानी तसेच शासनाने या वयोवृध्द स्वातंत्र सेनानीला तोफांची सलामी देत शाही इतमामात अंत्यसंस्कार करित भावपुर्ण निरोप दिला. आजही आमचे पाच भावाचे कुटुंब बुर्ली व रामानंदनगर वासिय व शासनाचे विनम्र आभारी आहोत.आमचे पुज्य पिताजी कै.बाबु बाळा नदाफ पिंजारी याना भावपुर्ण श्रध्दांजली. दिनांक 15आँगस्ट 2023 रोजी आपण स्वातंत्रसेनानी व आमचे परमपुज्य वडिल कै. बाबु बाळा नदाफ पिंजारी यांच्या पत्नी व आमची आई यांचा स्वातंत्रसैनिकांची विधवा पत्नी म्हणुन सत्कार केलात. याबद्दल आम्ही सर्व नदाफ पिंजारी बुर्लीकर कुटुंबिय भावविवश आहोत व अत्यंत आभारी आहोत. भारतीय स्वातंत्रदिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा.

, आपले
डाॅ. रफिक समसेर नदाफ पिंजारी
हाजी रमजान बाबु नदाफ पिंजारी
हाजी अमिर बाबु नदाफ पिंजारी
हाजी नसरूद्दीन बाबु नदाफ पिंजारी,
उप कार्यकारी अभियंता, महानिर्मिती (मराविमं), कोयना जलविद्युत केंद्र पोफळी
डाॅ. अनसार वजीर नदाफ पिंजारी
आणि समस्त नदाफ पिंजारी कुटुंबिय, बुर्ली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली.

संपादकीय....
या आमच्या कुटुंबातील प्रमुख  हजानीमा स्वातंत्र्य सेनानीच्या पत्नी जुबेदाबी या आदर्श मातेने फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार न करता आपल्या आजूबाजूच्या नातलगांचा व शेजा-या पर्यंत विचार करून त्यांना देखील मदत केलेली आहे ... याच ज्वलंत उदाहरण म्हणजे मी "सलीम नदाफ" लोकसंदेश न्यूज संपादक सांगली..  आमचे वडिलांचे गाव मनेराजुरी आमच्या वडिलांच्या या चुलत बहीण होत.. काय झालं मनेराजुरी मध्ये आमचे आजोबा आजी आणि आमचे  वडिलांचे चार भावंडासह राहत होते.. परंतु कर्म धर्म संयोगाने आमचे वडिलांची आई त्यांच्या जन्मानंतर वर्षभरातच वारली आणि आमचे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील यांचे दीड दोन वर्षातच निधन झाले ...  आमच्या वडिलांना चार भाऊ अकबर, गुलाब, मुबारक, सर्वात शेवटी लहान इब्राहिम म्हणजे आमचे वडील .. त्यावेळेला आमच्या वडिलांचे वय अवघे दीड दोन वर्ष असाव... या सर्व चारी अनाथ मुलांना या "आदर्श मातेने जुबेदाबी" ने आपली परिस्थिती नसताना देखील आपल्या गावी  बुर्ली येथे आणून  त्यांच संगोपन  करण्याचे काम ह्या आमच्या वडिलांच्या बहिणीने केले त्यामध्ये सर्वात लहान आमचे वडील जे फक्त दीड वर्षाचे होते , त्यांना सांभाळून त्यांना मोठे करण्यात व त्यांच्या संगोपन करण्यात या "आदर्श माते"चा फार मोठा हातभार लागलेला आहे.... अशा या आदर्श  मातेचे ऋण आम्ही या जन्मात फेडू शकत नाही... ..अशा या मातेस मी व आमच्या कुटुंबियान  तर्फे लाख लाख सलाम ..सलाम .. अल्लाह त्यांना दीर्घायुष्य देवो.. आमच्यावर त्यांची सतत कृपा व आशीर्वाद राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना....
आपला:
सलीम नदाफ, संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली व महाराष्ट्र उद्योग समूह सांगली.
8830247886