लोकसंदेश न्यूज नेटवर्क
साहित्यरत्न डॉ.आण्णाभाऊ साठे मार्गाचे नामकरण...
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील वार्ड क्रं.१० मधील सांगली कॉलेज कॉर्नर व्हाया टिंबर एरिया ते रमाई आंबेडकर उद्यान या मार्गाचे साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे मार्ग असे नामकरण लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी जेष्ठ नगरसेवक मा. शेखर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या पाठपुराव्यानुसार व मागणीनुसार महानगरपालिकेने या रस्त्याचे नामकरण केले तत्पूर्वी रमाई आंबेडकर उद्यान येथे आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह नगरसेविका सौ.अनारकली कुरणे,नगरसेवक संजय कुलकर्णी, नगरसेवक विनायक सिंहासने,माजी नगरसेवक मुन्ना कुरणे,अरुण आठवले,सुरेश जाधव,प्रा.रवींद्र ढाले सर,जंयती समितीचे अध्यक्ष विशाल पवार,आशिष उर्फ मनोज गाडे,अश्विनकुमार मुळके,जमीर कुरणे,शिवाजी वाघमारे,आशितोष कलगुटगी,अजय उबाळे,छाया कांबळे,अमिता कांबळे,गिता पवार,शहाजी मोरे,अर्जुन मजले,गणपती चवडीकर,सचिन ऐवळे,नितीन साबळे,राहूल शिंदे,सुरज पवार,सुशांत कांबळे,रवी तंगडी,आकाश जयकर,गणेश कांबळे,कबीर व्हनकटे,शशिकला घाडगे,धनेश कातगडे,आशा साबळे,अशोक मासाळ, अनिल साबळे,सुरेश गलांडे,रमेश सावंत,ऋषिकेश बनसोडे,अरुण धनवडे,प्रभाकर कांबळे,आबा हेगडे,जय खाडे यांच्या बरोबरच अन्य मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन युवा कार्यकर्ते प्रफुल्ल ठोकळे यांनी केले
आण्णाभाऊ साठे युवा मंच तर्फे नगरसेवक ठोकळे यांचा सत्कार..
सांगली कॉलेज कॉर्नर व्हाया टिंबर एरिया ते रमाई आंबेडकर उद्यान या मार्गाचे नामकरण साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे केल्याबद्दल लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंच, व अभिनव कला क्रीडा मंडळच्या वतीने नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचा सत्कार करण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.