भारत.. तिरंगा आणि स्वातंत्र्य लढा आमची श्रध्दा आणि शक्तीस्थळं... पृथ्वीराज पाटील

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

भारत.. तिरंगा आणि स्वातंत्र्य लढा आमची श्रध्दा आणि शक्तीस्थळं... पृथ्वीराज पाटील
भारत.. तिरंगा आणि स्वातंत्र्य लढा आमची श्रध्दा आणि शक्तीस्थळं... पृथ्वीराज पाटील


सांगली दि.९: आम्हाला सर्व ध्वज पवित्र आहेत परंतु तिरंगा हा आमच्या रक्तातच आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपली घरं दारं उध्वस्त करुन घेतली. म.गांधी आणि त्यांच्या अनुयायांनी स्वतंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या.. त्याग व बलिदानाचा इतिहास म्हणजे स्वातंत्र्य लढा आहे. या लढ्याचे गौरवशाली प्रतिक आणि भारताचे अस्तित्व आणि अस्मिता म्हणजे आपला तिरंगा ध्वज आहे. म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांना चले जावचा निर्वाणीचा इशारा देऊन करा किंवा मरा हा प्रेरक संदेश दिला गेला आणि ऑगस्ट क्रांती झाली. देशातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार, अबाल वृध्द सारेच या लढ्यात सहभागी झाले ही सामुदायिक जनतेची क्रांती होती म्हणून भारत, तिरंगा आणि स्वातंत्र याबाबतीत अभिमान व आदर बाळगून देशाची अखंडता.. लोकशाही व स्वातंत्र्य रक्षणार्थ सिध्द व्हा.. असे भावपूर्ण उद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. सांगली शहर जिल्हा काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने आज 9 ऑगस्ट क्रांतीदिनी हुतात्मा स्मारक येथे आयोजित स्वातंत्र सैनिक आणि त्यांचे उत्तराधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. रतन पाटील होत्या.
सकाळी आठ वाजता महत्मा गांधी, पंडित नेहरू, वसंतदादा पाटील, हुतात्मा अण्णा पत्रावळ, काँग्रेस भवनमध्ये रामानंद तीर्थ, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी पृथ्वीराज पाटील यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण केले व स्वातंत्र्य सैनिक भारती बेलवलकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर पृथ्वीराज पाटील, सुभाष खोत व डॉ. रतन पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र सैनिकांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी प्रास्ताविकात प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी त्याग केला त्यांचे देशावर मोठे ऋण आहेत. त्यांचा सांगली काँग्रेसला अभिमान आहे. आशिष कोरी यांनी स्वातंत्र्य, राष्ट्रध्वज याचे महत्व सांगितले.सुभाष खोत म्हणाले, 'तिरंगा ध्वज ही देशाची शान आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.देश मजबूत होण्यासाठी काँग्रेस पक्ष मजबूत होणे आवश्यक आहे.युवकांना हे समजले पाहिजे.'


यावेळी स्वातंत्र सैनिक श्रीमती भारती दिगंबर बेलवलकर, श्रीमती सीताबाई अच्युतराव कुलकर्णी यांचा व उत्तराधिकारी रघुनाथ बाळकृष्ण नार्वेकर, रामचंद्र गणपती पवार, जयसिंग सावंत, नारायण विठोबा जाधव, राकेश सुरेश देसाई, बाबगोंडा पाटील यांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. प्रतिक्षा काळे यांनी ध्वजगौरव गीत गायले. सूत्रसंचालन व आभार अरुण पळसुले यांनी मानले. 


यावेळी प्रा. एन.डी.बिरनाळे, सुभाष खोत, आशिष कोरी, रोटरीच्या डॉ. रतन पाटील, धनंजय पाटील, अरुण पळसुले, विठ्ठलराव काळे, वसीम रोहिले, शैलेंद्र पिराळे, नामदेव पठाडे, मौलाली वंटमुरे, भाऊसाहेब पवार, विश्वास यादव, नंदाताई खंदारे, प्रतिक्षा काळे, चेतन पाटील, भिमाण्णा बंडीवडर, बाबगोंडा पाटील, नंदादेवी कोलप, शमशाद नायकवडी, श्रीधर बारटक्के, संजय पाटील, सौ. शीतल बेलवलकर, विजय पाटील, मारूती देवकर, अय्युब निशाणदार, मारूती देवकर, याकुब मनेर, ताजोद्दिन शेख, तेजस भंडारे, कांचन भंडारे, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.