सांगली रिलायन्स दरोड्यातील आरोपीस अटक... अथक प्रयत्नानंतर सांगली पोलिसांची मोठी कारवाई....
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, कोल्हापूर परिक्षेत्र व सांगली पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, यांचे मार्गदर्शन खाली केली कारवाई...
या बाबत माहिती अशी की,,
दि. ०४.०६.२०२३ रोजी मार्केट यार्ड सांगली येथील रिलायन्स ज्वेलर्स येथे अज्ञात सहा ते सात आरोपींनी परराज्यातील पोलीस अधिकारी व पथक असल्याची बतावणी करून दुकानातील स्टाफ व ग्राहकांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत एका बाजुस घेवून हात पाय बांधुन रिव्हॉल्वर रोखून जिवे मारण्याची धमकी देवून शिवीगाळ करून रिव्हॉल्वर मधून गोळी झाडून रिलायन्स ज्वेलर्सची काच फोडून ज्वेल्समधील सोने,
डायमंडचे दागिने, रोख रक्कम चोरून दुकानात दरोडा घालून चार चाकी टाटा सफारी वाहन क्र. एम एच ०४ ई
८८९४ या मधून व दुचाकी वरून पळून गेले होते.
दि. ०४/०६/२०२३ रोजी घटनास्थळास कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनिल | फुलारी व पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली यांनी भेट देत गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याकरीता सुचना व मार्गदर्शन केले होते.
वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील पथके गुन्हा घडले पासून आरोपींचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास हा गुन्हा पर राज्यातील सराईत टोळीने केला असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्या नंतर पुढील तपास कामी वरिष्ठांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथके आरोपींच्या शोधाकरीता तातडीने बिहार तसेच गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा व ओडीसा राज्यात तसेच
महाराष्ट्रातील आठ जिल्हयामध्ये रवाना झाली होती. या टोळीबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नमुद गुन्हा हा अतिसंवेदनशील असल्याने अहोरात्र सखोल तपास करून नमुद पथकाने टोळीतील आरोपींची नांवे निष्पन्न करून पर राज्यामध्ये पन्नास दिवसापेक्षा जास्त दिवस वास्तव्य करून आरोपी शोध अनुशंगाने धागेदोरे मिळवले होते. आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे वारंवार आपले वास्तव्य ठिकाण बदलत असल्याने त्यांची माहिती मिळण्यास अडथळे निर्माण होत होते. अशा परिस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पोलीस उपनिरीक्षक अकीब काझी व पथक यांचे बिहार राज्यात आरोपींचा शोधकार्य करीत असताना दाखल गुन्हयामध्ये सहभाग असलेला आरोपी अंकुरप्रताप सिंग वय २५ वर्षे, रा. तारवान . नौबातपुर, जि. पाटणा, राज्य बिहार हा सध्या ओडीसा राज्यात असल्याबाबत माहिती मिळाली आरोपीची इत्यंभूत माहिती प्राप्त करून त्यास ओडीसा राज्यातील बारगड जिल्हयातुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी अंकुर प्रताप सिंग यास मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १० दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत. सदर आरोपीने चौकशी दरम्यान त्याचा गुन्हयामधील सहभाग व त्याचे साथीदार या संदर्भाने उपयुक्त माहिती दिली आहे. त्याचेकडे अधिक तपास चालू आहे. यातील ताब्यातील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचेवर बिहार व ओडीसा राज्यात जबरी चोरी व आर्म अॅफ्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद दाखल गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी व इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. सदर टोळीविरुध्द बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरीसा तसेच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
या सर्व कारवाईत
सहा. पोलिस पंकज पवार, संदिप वाघमारे, विश्रामबाग पोलीस कुमार पाटील, आकिब काझी,
संदीप गुरव, बिरोबा नरके, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, दरीबा बंडगर, नागेश खरात, सागर टिंगरे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, संदिप नलवडे, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, अजय बेंदरे, विश्रामबाग पोलीस ठाणेकडील अनिल ऐनापुरे, बसवराज शिरगुप्पी, अमोल भोळे, इरफान पखाली, शिवाजी ठोकळ, आर्यन देशींगकर, संदीप घरते.यांनी सहभाग घेतला होता
अशी माहिती
सतिश शिंदे पोलीस निरीक्षक यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधताना दिली..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली