मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन ; आमदार सुधीर गाडगीळ...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन ; आमदार सुधीर गाडगीळ...



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन ; आमदार सुधीर गाडगीळ..


सांगली १४ सप्टेंबर २०२३ : मराठा समाजाच्या काही मागण्यांसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांनी गेली १६ दिवस उपोषण केले. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी समक्ष उपोषण स्थळी येवून श्री. जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि त्यानुसार त्यांनी आज आपले उपोषण मागे घेतले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत युती सरकार आणि मा. मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत, हेच यातून दिसून आले. या उपोषणा मुळे श्री. जरांगे यांच्या प्रकृती बाबत साऱ्या महाराष्ट्राला काळजी लागून राहिली होती. 


आणि ना. मुख्यमंत्री. शिंदे यांच्या पुढाकाराने हि काळजी संपली आहे. श्री. जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी जे त्याग आणि धाडस दाखविले आहे. त्याबद्दल प्रत्येक मराठी माणसांच्या मनात त्यांच्या बद्दल आदर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या सदिच्छा श्री. जरांगेंच्या पाठीशी कायम राहील.


 महाराष्ट्रात या प्रसंगाने जो तणाव निर्माण झाला होता. तो नामदार एकनाथ शिंदे आणि श्री. जरांगे यांच्या समन्वयाच्या भुमिके मुळे निवळला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्री. मनोज जरांगे यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. असे निवेदन सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.