विजय मगदूम यांचे आपघाती निधन....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विजय मगदूम यांचे आपघाती निधन....





आमचे मित्र विजय मगदूम यांचे आपघाती निधन....

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील सदोष स्पीड ब्रेकर मुळे कित्येक जणांचे बळी गेलेले आहेत... सदर व्हिडिओ मध्ये स्पीड ब्रेकर मुळे गाडी वरून पडुन मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राचे वाहतूक महासंचालक मा. सिंघल साहेब सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत त्यांना विनंती आहे की,ह्या बाबतीत पाहणी करून उपाययोजना कराव्यात
आणि ह्या बाबतीत दोषी असणाऱ्या वर कार्यवाही करावी...

तसेच संबधीत यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा ...

तसेच हेल्मेट किती गरजेचे आहे व गाडीचे स्पीड सुध्धा मर्यादितच पाहिजे.. ह्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ...

आमचे मित्र  विजय मगदूम  यांचे आपघाती निधन...




या सी.सी.टी.व्ही.चे बारकाईने अभ्यासपूर्वक निरीक्षण केले तर, समोरून येणारा मोटरसायकलस्वार ज्याला कदाचित येथे स्पीड ब्रेकर आहे असं माहीत असणारा असावा तो सावकाश येत आहे.. तो व्यवस्थित पास झालेला आहे
त्याच्यानंतर विजयराव यांची गाडी फुल स्पीड मध्ये होती व त्यांच्या डोक्यात विचार असल्यामुळे किंवा त्यांना तो स्पीड ब्रेकर लक्षात नाही आल्यामुळे.. यांची गाडीवर स्पीड मध्ये उडून ते बाजूला पडले असे दिसत आहे.. त्याच्यानंतर परत एक मोटरसायकल ज्या मोटरसायकलवर दोन जण आहेत, ही गाडी सुद्धा स्पीडनेच होती.. परंतु त्या गाडीवर दोन जण असल्यामुळे ही गाडी उडून पडली नाही... असे या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे


या अपघातावरून शहरात राहणाऱ्यांनी मोटरसायकल , कार आणि बसेस, ट्रक चालवणाऱ्यांनी शहरात कशा गाड्या चालवाव्यात त्याचे स्पीड लिमिट काय असावं.. या बद्दल स्वतःच्या मनावर कंट्रोल टाकत सिटी मध्ये गाड्या चालवल्या पाहिजेत...

आपला मुलगा /मुलगी दहावी अथवा बारावी पास झाल्यानंतर त्यांचे पालक त्यांना गाडी घेवून देत असतात.. लायसन्स पण काढून देत असतात... परंतु त्याला गाडी चालवण्याची अक्कल अथवा प्रबोधन कुठल्याही पालकांनी आपल्या मुलाला दिलेले दिसत नाही... त्यामुळे ही मुले शहरात देखील सुसाट वेगाने गाडी चालवून आपला व समोरच्याचा जीव धोक्यात घालत असतात..

कोणताही सण असो, मग तो पैगंबर जयंती, शिवजयंती , आंबेडकर जयंती ईतर कोणतेही कार्यक्रम अथवा कोणत्याही नेत्याचा वाढदिवस किंवा जयंती... झुंडी ने मोटरसायकली सर्व शहरांमध्ये सायलेन्सर काढून इतक्या स्पीडने फिरवल्या जातात की, समोर एखाद्या व्यक्ती आला तर तो चिडूनच जायला पाहिजे ..नववी आणि दहावी नंतर कॉलेजचा संपूर्ण तरुण वर्ग यांना कोणत्याही प्रकारची वाहतुकीची, कायद्याची, गाड्या चालवण्याचे कोणतेही ज्ञान नसते किंवा पालकांनी अथवा शिक्षकांनी , कॉलेजने ,दिलेले नाही नसते.. आर.टी.ओ. ने लायसन्स दिले म्हणजे त्यांना चांगली गाडी चालवता येते अशातला भाग नाही..

मी स्वतः एस.टी. स्टँड परिसरात रहात असल्याने पुष्पराज चौक ते एस.टी. स्टँड पर्यंत मोटरसायकल असो, कार असो, अथवा सिटी बसेस वा बाहेरगावातून येणाऱ्या एस.टी. बसेस असतील त्या हॉस्पिटल रोडला इतक्या सुसाट पळत असतात की, त्यामुळे या रस्त्यावर स्पीडब्रेकरची लोक मागणी नागरिक करत असतात ..पुढे ब्रेकर पाहिजे किंवा नाही हा एक वेगळा विषय आहे..

या सुसाट गाड्यांमुळे स्पीड ब्रेकरची मागणी नागरिकांतून होत असते, परंतु महानगरपालिका,पोलीस प्रशासन ,या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारणे, एखादा दिवा लावणे, किंवा त्याची स्पीड ब्रेकरची जाणीव करून देण्यात कोणत्याही प्रकारची सुविधा न दिल्यामुळे हे अपघात होत असतात... सर्व अपघाताचे एकमेव इलाज म्हणजे सिटीतील वेग किती असावा... परंतु याचं काही गणित आज तरी महाराष्ट्रात दिसत नाही... आम्ही महाराष्ट्राचे वाहतूक महासंचालक सिंघल साहेब यांना विनंती करतो की, महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये गाडी चालवण्यासाठी मग ती मोटर सायकल असो, कार असोझ अथवा बसेस, ट्रक असोत, त्यांना सिटी मध्ये वेगासाठी काहीतरी वेगळा नियम घातल्याशिवाय शहरातील अपघातांना आळा बसणार नाही...

वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही चे जाळे पसरलेलेच आहे. परंतु अधिक  स्पीड  असलेल्या लोकांच्यावर केसिस झाल्या त्याचे याची माहिती उपलब्ध नाही..

बाहेरच्या देशामध्ये अगोदर मनुष्य व जीवित प्राण्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी प्राधान्य दिलं जातं... 

परंतु आपल्याकडे एखादा वयोवृद्ध म्हातारा, म्हातारी असो, बालक, पालक असो, स्त्री असो, ती रस्ता क्रॉस करण्यासाठी  दहा ते पंधरा मिनिटे वाट बघत असताना कोणी थांबायला तयार नसते... याच्यावर देखील मानवतेच्या दृष्टीने आज सर्व वाहनधारकांनी विचार करण्याची   गरज आहे...

या रस्त्याकडेला रस्ता क्रॉस करण्यासाठी उभारलेले आपले आजी ,आजोबा असू शकतात ,आपले आई-वडील, आपली मुले ,आपली भाऊ,बहीण, असा विचार केला तर त्यांना जाण्यासाठी अगोदर रस्ता द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपली गाडी जायला पाहिजे... हे कोणी आजपर्यंत डोक्यात घेतलेले दिसत नाही... परदेशात असं नाही..

 आम्ही सौदी अरेबिया मध्ये बघितले 180 ने  जरी एखाद्या वाहनाचे स्पीड असेल तरी रस्ता क्रॉस करनाऱ्याला  प्राधान्याने माणसं असतील किंवा प्राणी असतील जनावर असेल त्यांना प्राधान्याने रस्ता क्रॉस करू दिला जातो ...नंतर ती गाडी निघून जाते ..एवढा बोध महाराष्ट्रात व भारतामध्ये आपल्या कडे कधी येणार... याच्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे

 ...लवकरच लोकसंदेश न्यूजचे संपादक म्हणून मी या रहदारीच्या विषयावर  पुस्तिका प्रकाशित करीत आहे आणि ती अंतिम टप्प्यात आहे... ही पुस्तिका वाचल्यानंतर अपघातांचे प्रमाण निश्चितपणाने कमी होतील अशी मला आशा आहे.. असो ...

या विषयावर लिहिण्यासारखं बरंच आहे  आमचे मित्र विजय मगदूम यांच्या अपघाती निधनाने आम्हांस व्यथा झालेली आहे.

आमचा एक सच्चा मित्र या सिस्टीम मुळे आज हरवला आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ..त्यांना आमच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली....  


 सलीम नदाफ ; संपादक;लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

8830247886