आज त्यांच्या मातोश्री 98 वर्षाच्या आहेत आमची खरी संपत्ती म्हणजे आमची आई आहे त्याच्या पेक्षा मोठे जगात काहीही नाही....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आज त्यांच्या मातोश्री 98 वर्षाच्या आहेत आमची खरी संपत्ती म्हणजे आमची आई आहे त्याच्या पेक्षा मोठे जगात काहीही नाही....



लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

आज त्यांच्या मातोश्री 98 वर्षाच्या आहेत आमची खरी संपत्ती म्हणजे आमची आई आहे त्याच्या पेक्षा मोठे जगात काहीही नाही....


आज दिवाळी च्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी अकरा वाजता आपल्या सांगली जिल्हा पालकमंत्री मा.नाम. सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या बंगल्यावर पोचलो निमित्त होते आमचे मित्र प्रदीप कांबळे यांची भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल पालकमंत्री साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार होता    
सत्कार संपन्न झाला ..दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या 
आम्ही बाहेर आलो आणि वैभव नलवडे साहेब यांनी आम्हाला परत निरोप दिला साहेब परत आत बोलवत होते.  


आत गेलो तर समोर फराळाचे ताट समोर ठेवले होते
खाली बसा घरातील फराळ आहे... सगळा संपवायचा 
समोर बरेच लोक आपल्या समस्या घेवून येत होते... त्यांच्या कामाचा जागेवर निपटारा सुरू होता त्यातून आवाज अरे अजून ताटातील फराळ तसाच आहे लाडू घ्या चकली घ्या आग्रह सुरूच होता बाहेरील लोक संपले मग गप्पा रंगल्या ...
चिंतामणनगर रेल्वे अंडर पास,सांगली पेठ रस्ता, शेरीनाला,मिरज विधानसभा मतदार संघात किती कामे सुरू आहेत कोण कोणत्या स्वरूपाची आहेत असे विषय वर चर्चा सुरू झाली
त्यातुन मंत्री पदाचा निरोप कसा आला त्या वरचे किस्से भाऊ सागत होते आज भाऊचा मुड मस्त होता 
त्यात सर्वात महत्वाचा विषय निघाला भाऊकडे असणारे कामगार कल्याण खाते किती महत्वाचे आहे व किती मोठ्या प्रमाणात काम करायला वाव आहे...
त्यातूनच एक किस्सा सांगितला माझगाव डॉक येथे एक शीपचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यात राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्या बरोबर त्यांना ही निमंत्रित करण्यात आले होते
ज्या माझगाव डॉक वर काम केले त्याच डॉक वर एक कामगार मंत्री म्हणून जाण्याचा अनुभव सागताना भाऊ भावनिक झाले होते
कॉलेज मध्ये शिकत असताना vjti कॉलेज मुबई येथे सिल्वर मेडल मिळाले होते 
तीन वर्ष ccti केले पुढचे शिक्षण साठी भरण्यासाठी पैसे नव्हते म्हणून माझगाव डॉकमध्ये अप्रेंटसिप  म्हणून नोकरी केली 
1978 ते 1993 नोकरी केली 1993 ला नोकरी सोडून दिली
नोकरी सोडून तिघा भावांनी मिळून व्यवसाय सुरू केला तो एवढ्या कष्टाने आज पर्यंत सुरू आहे
दत्ता खाडे,आशोक खाडे,सुरेश खाडे 
दास (D A S) ऑफशर्ष हि कंपनी सुरू केली.

आम्हाला त्यांच्या भूतकाळातील गोष्टी सांगत असताना व चर्चा करत असताना 
 एक मुलगा आणि त्याचे वडील आले त्यानी एका मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून जागा निघाली आहे आपण त्या कंपनीतील  मोठ्या साहेबाना फोन करावा असे सागितले जागेवर वैभव यांनी तत्काळ त्या अधिकारी यांना फोन लावला भाऊ नी सागितले आणि फोन झाल्यावर त्यांना जागेवर शिफारस पत्र दिले 
आम्ही भाऊना विचारले सदर व्यक्ती आपल्या परिचयाची आहे का?भाऊ म्हणाले असे का विचारता आम्ही बोललो सदर ठिकाणी त्या मुलाला जर नोकरी मिळाली तर किमान तीस ते चाळीस हजार रुपया पगार मिळेल 

मग एवढ्या सहज फोन करून काम मार्गी लावले तर त्यांनी सागितले माझ्या दारात काम घेवून येणारा माणूस कोणत्या जातीचा आहे कोणत्या राजकीय पक्ष्याचा आहे त्याने माझे काम केले आहे का माझ्या विरोधात काम केले आहे हे मी पाहत नाही येणाऱ्या प्रत्येक घटकाचे काम करणे याला प्राधान्य दिले जाते
 2004 साली सांगली जिल्हा मध्ये जत विधानसभा मतदार संघात पहिल्यांदा सुरेश भाऊ खाडे यांच्या रूपाने भारतीय जनता पार्टीचे पाहिले आमदार झाले आणि कमळ फुलले 

 सलग तीन वेळा मिरज विधानसभा मतदार संघात आमदार म्हणून ते निवडून येत आहेत
भारतीय जनता पक्ष मध्ये मागून काहीही मिळत नाही आपण आपले काम निष्ठेने आणि प्रामाणिक पणाने करत राहायचे असते
पक्षात कधी संधी मिळते हे कळत नाही म्हणून त्यांनी प्रदीप कांबळे यांना सागितले प्रामाणिक पणाने काम करत रहा पक्ष काम पाहून नक्की पोच पावती देतो
एक तास सर्व आठवणींना उजाळा देत चर्चा सुरू होती
भाऊ म्हणाले सगळे सागत बसलो तर दिवस पुरायचे नाहीत 
परत कधीतरी बसूया....
आज त्यांच्या मातोश्री 98 वर्षाच्या आहेत आमची खरी संपत्ती म्हणजे आमची आई आहे त्याच्या पेक्षा मोठे जगात काहीही नाही....

आज दिवाळी निमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा सांगली .
_______________________________________________

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.