आमचे जुने संजय काका आम्हाला परत द्या..:सतीश साखळकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आमचे जुने संजय काका आम्हाला परत द्या..:सतीश साखळकर



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

आमचे जुने संजय काका आम्हाला परत द्या.............
; सतीश साखळकर

साल 1992 तात्कालीन सांगली नगरपालिका निवडणुकीच्या वॉर्ड रचना झाल्या होत्या
मी त्यावेळी दहावीला होतो... चांगले आठवते
1987 च्या सांगली विधानसभा पोटनिवडणुकीत आमदार म्हणून संभाजी आप्पा पवार हे विष्णू अण्णा पाटील यांचा धक्कादायक पराभव करून निवडून आले होते..

सांगली शहराच्या राजकारणात अण्णांच्या बरोबर मदन भाऊ पाटील राजाभाऊ जगदाळे व अन्य नेते स्थानिक राजकारणात सक्रिय होते..

तत्कालीन सांगली नगरपालिका नगराध्यक्ष निवडीत बंडखोरी करून आजिजभाई शिकलगार व इतर विरोधी पक्ष नगरसेवक यांची मते घेवून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, सगळा काळ संघर्ष आणि अकल्पित उलथा पालथ झाली होती

या निवडणुकीत आमच्या त्या वेळचा वॉर्ड क्रमांक 24 हा खुला पडला होता या वॉर्डांत अजीजभाई शिकलगार सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले 
राजकीय बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या.

त्यावेळी सांगली नगरपालिका मध्ये जोतीराम दादा सावर्डेकर यांचा फार मोठा बोलबाला होता
त्यांच्याच पुढाकाराने डी.के.काका पाटील यांचा  दबदबा निर्माण झाला होता..

मग खणभागात त्या वेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेले संजय काका पाटील त्यांना त्यावेळी त्यांचे भोसले तालमीतील समर्थक "मालक"या नावाने संबोधत असतं..

कॉलेमधल्या यू आर सी आर निवडणुकीत राजकीय वर्चस्व निर्माण करून चर्चेत आलेले नवीन नाव, सोबतीला आमदार दिनकर पाटील ,तासगाव सांगलीत सावर्डेकर कुटुंबाचे नाते वडील डी वाय एस पी म्हणून चर्चेत असा सगळा पसारा असणारे काका आमच्या वॉर्डातील काँग्रेस पक्ष्याची उमेदवारी घेवून उभे राहीले आणि हरूनभाई शिकलगार यांचा पराभव करून निवडून आले..

ती निवडणूक आयुष्भर लक्ष्यात राहणारी आहे आणि त्या वॉर्डातील मतदारांना आज ही ती चांगली आठवते...
त्याच पाच वर्षात काका उपनगराध्यक्ष झाले
त्यानंतर ते तासगाव तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाले...
त्यावेळचा संजय काका यांचा संघर्ष आम्ही अनुभवला आहे ,तो सगळ्या सांगली जिल्ह्यातील लोकांनी  बघितला आहे
तासगाव तालुक्यातील राजकारणात आर आर आबा पाटील यांना विरोध करत संजय काका पाटील यांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला, त्याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली आणि आर आर अबाना राज्य भर फिरण्यासाठी मोकळीक असावी म्हणून शरद पवार साहेबांनी काकांना विधान परिषद सदस्य म्हणून घेतले आणि काकांचा राज्याच्या राजकारणात सुरवात झाली..
त्यावेळी आबांच्या बरोबर संघर्ष करताना जीवाला जीव देणारे समर्थक यांचे मोठ्या प्रमाणात राजकीय सामाजिक खाच्चिकरण होत होते तरी त्यांचे समर्थक मागे हटले नाहीत ही त्यांची जमेची बाजू आहे

त्याच वेळी तासगाव कारखाना सुरू करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार आणि त्याचा संघर्ष सुधा पाहिलेला आहे
ह्या सिजन मध्ये कारखाना सुरू होत आहे त्याचे कौतुक आहे

आणि 2014 साली देशात मोदी पर्व सुरू झाले होते.. गोपीनाथ मुंडे यांच्या नजरेतून माणसे सुटत नव्हती त्यांनी बरोबर सांगली लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत मुंबई येथे पक्ष प्रवेश घेतला आणि उमेदवारी जाहीर केली त्यावर उलट सुलट चर्चा झाली ...आप्पा नाराज झाले..

मात्र मोदींच्या साठी मला खासदार म्हणून निवडून द्या असा प्रचार केला आणि सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा गड भारतीय जनता पक्षाने लीलया सर केला
त्याला स्थानिक सांगली जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती कारणीभूत आहे त्यावर वेगळी चर्चा होईल

काकांची राजकीय कारकीर्द पाहता नवीन संधी मिळत असल्याने सांगली जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत काही तरी घडेल अशी अपेक्षा होती आणि अजून हि आहे...

2019 ला परत मोदी लाटेत काका दुसऱ्यांदा खासदार झाले 

देशात आणि राज्यात दोन्ही ठिकानी भारतीय जनता पक्षाच्या सत्ता असल्याने इतर मतदार संघात ज्या पद्धतीने विकास सुरू होता त्याच धर्तीवर आपल्या सांगली जिल्ह्यातील विकास सुरू होता..

 मात्र .....

मोठे उद्योग,विमानतळ,ड्राय पोर्ट, लॉजिस्टिक् पार्क,रेल्वे स्टेशन चा कायापालट ह्या बाबतीत अपेक्षा वाढत असताना 
त्यावर कार्यवाही समाधानकारक दिसत नाही म्हणून आम्ही व्यक्ती विरोध म्हणून विरोध न करता मागण्या लावून धरल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा सुरूच आहे...
आम्ही संघर्ष करताना व्यक्तीला विरोध करत नसून त्या पदाला विरोध असतो हे समजून घेतले पाहिजे

वरील महत्वाच्या विषयावर काकांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून न्याय द्यावा अशी विनंती आहे

रत्नागिरी नागपूर ,पुणे बंगलोर ग्रीन कॉरिडॉर,शक्ती मार्ग ,सांगली पेठ रस्ता अश्या बऱ्याच कनेक्टिव्हिटी होत आहेत तसेच सिंचनाच्या सुविधा होत आहेत ह्यातील योगदान कोणी नाकारणार नाही..

जुना संघर्ष परत जागा करून आपल्या सांगली जिल्ह्यातील विकास कामांच्या बाबतीत आपण परत एकदा संघर्ष करावा अशी सांगली जिल्ह्यातील एक नागरिक म्हणून विनंती आहे

दिवाळी सुट्टीत काहीतरी वेगळे करावे म्हणून हा प्रयोग करत आहे ...तो बरोबर आहे का चुकीचा आहे ...माहिती नाही... मात्र प्रयत्न करत आहे समजून घावे 

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.
_______________________________________________

संपादकीय...

               शापित सांगली ......

सतीश साखळकर यांची सांगली विषयी असणारी तळमळ कार्यपद्धती सर्व ज्ञात आहे... सांगली विषयी आम्ही बऱ्याच वेळा लिहिलं... सांगितलं ... सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बरोबर चर्चेत हा विषय वारंवार आलेलाच आहे... 
परंतु काका सांगलीकर होते तर आता ते तासगावकर झाले ..
त्यांनी सांगलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.. परंतु " कुठे "माशी शिंकली" माहिती नाही सांगलीची दैनाच होत गेली... मग ते जयंत पाटील असोत, सुमनताई असतील, संजय काका असतील, किंवा सांगलीचे निवडून येणारे आमदार सुधीरदादा, सुरेश खाडे, आ. बाबर. ही सर्व नेते असतील... आपल्याबरोबरची सर्व शहरे, गावे ही महामार्गाला जोडली गेलेली आहेत त्यांची कालानुरूप प्रगती झालेलीच आहे...पण सांगलीने काय पाप केलंय हे कळून येत नाही .. सांगलीचे  जयंत पाटील मंत्री असताना देखील सांगली इस्लामपूर रोड महामार्गास जोडला गेला नाही... त्याची व्यथा सांगलीकर भोगत आहे ...आणि हे सत्य आहे ...सर्व आमदार खासदारांनी व मंत्र्यांनी सांगली शहरासाठी काय केलं याची एक "श्वेतपत्रिका" त्यांनी जाहीर करावी..  सांगली शहारासाठी आम्ही "हे" केलं म्हणून... सांगावं. सांगलीकर तुमच्या पाठीवर थाप मारतील ...आम्ही संपादक म्हणून बऱ्याच वेळा सांगलीच्या विषयी "अस्था" असणाऱ्या लोकांचे वेळोवेळी कौतुकच केलेल आहे ..परंतु या सर्वांना सांगली शहराची "अस्था" असावी असं त्यांच्या कामावरून आज तरी दिसत नाही. ....

याचं कारण म्हणजे ,सांगलीतील बरेच व्यवसाय बाहेर गेले ,जसे मार्केट यार्डातील प्रमुख असणारे व्यापार आता मार्केट यार्ड मध्ये नाहीत..गणपती पेठ संपत आलेली आहे, विमानतळाची जागा विकण्यापर्यंत मजल गेली,सांगली रेल्वेची कथा सर्वांना माहिती आहे... रस्त्याची दुरवस्था तर काय सांगावी!! असे एक ना अनेक बरेच प्रश्न सांगलीकर भोगत आहेत... एखाद्या खेड्यात राहून महापालिकेचे टॅक्स भरून सांगलीकर आपल्याच घरात भाड्याने राहिल्याच फिल घेत आहेत... (सांगलीची ग्रामपंचायत करता येते का? पहा निदान सांगलीकर टॅक्स मधून तरी वाचतील..)
 (महापालिका करण्यात इस्लामपूरच्या अण्णासाहेब डांगे यांचा हात होता) डांगे जाऊन बसले इस्लामपुरात... ही आमदार खासदार नेते मंत्री मंडळी सुद्धा  सांगली शहराची पूर्ण दैना करून "झोला उठाके आप आपल्या घरी" एक दिवस जातील... (डांगे पॅटर्न )
  महाराष्ट्र मध्ये प्रत्येक शहरात प्रगतीचे वारे नक्कीच आहे ...परंतु सांगली शहराला त्याचा काहीही फायदा झाला नाही अस आमचं मत आहे ... सांगलीच दुर्दैव अस आहे की, सांगलीची "अस्था" असणारे , सांगली जिल्ह्यातून असणारे कोणीही... आमदार, खासदार , मंत्री,या सांगली शहराविषयी काही ही करत नाहीत हे सत्य आहे ते आपला आपला भाग व राजकारण सांभाळत असतात.. असो ....

सतीशराव तुमची सांगली विषयीची तळमळ आहे प्रेम आहे त्याच्या पाठीशी आम्ही आहोतच... ...असो..

सर्व सांगलीकरांना व सर्व पक्षाच्या नेत्यांना
 दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .... 

सलीम नदाफ; संपादक::   लोकसंदेश न्यूज मीडिया प्रा. ली. मुंबई/ सांगली 

8830247886