माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणाऱ्या.... मार्गदर्शक,गुरू,मित्रांनो....... कुलदीप देवकुळे..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणाऱ्या.... मार्गदर्शक,गुरू,मित्रांनो....... कुलदीप देवकुळे..माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणाऱ्या....
मार्गदर्शक,गुरू,मित्रांनो....

(अगदी थोडक्यात)

बऱ्याच वर्षांपासून मनातील सुप्त परंतु तीव्र इच्छा आज आपल्यासमोर मांडत आहे. संभ्रम आणि भ्रम यामध्ये संपूर्ण मानवजात 'भ्रमण' करीत आहे. बहुतांशी लोकांचा जगण्यावरचा विश्वास उरला नाही, तिथं जिवंतपणा फक्त क्षणभंगुर...! या धावपळीच्या युगात, 'आपण का धावतोय..?' हा प्रश्न निर्माण होऊन उत्तराच्या शोधात निघण्यापूर्वी... तो प्रश्नच गर्दीत हरवून जातो आहे.आपण जगलेले,निखळ आनंद देणारे 'परिसक्षण'; ते सुद्धा या ऱ्हाटगाडग्यात गंजून गेले आहेत. असं मला वाटतं.मग नवी दिशा,नवा शोध, नवा बोध मला 'नेटपॅक' च्या माध्यमातून कितपत मिळू शकेल...? हा निर्जीव प्रश्न उगीचच वळवळत राहतो.

       (सीधी बात नो बकवास....)

एक सजीव-संजीव, निरंतर प्रेरणा -मार्गदर्शन करणारे,बळ देणारे, सक्षम करणारे, आत्मचिंतन करायला लावणारे, कमालीचे समाधान देणारे या पृथ्वीतलवार एकमेव आगार म्हणजे .... 'पुस्तकं' होय.
(.....जरा मन लावून)आज 21 नोव्हेंबर,
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने,
तासगाव तालुक्यातील माझ्या 'तुरची' ह्या मूळगावी
*विजय'दीप सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय* सुरू करीत आहे.


आजची ही प्राथमिक स्वरूपाची सुरुवात असली तरी येणाऱ्या काळात हे ग्रंथालय समाजाची गरज,आवश्यकता,उपयुक्तता,संशोधन, उज्ज्वल जडणघडण पूर्ण करेल. हा आत्मविश्वास आहेच.
....आणखी एक महत्वाचे आवर्जून सांगितले पाहिजे. 'विजय' हे नाव, व्यक्तिमत्व माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि तोच 'विजय' इतरांच्या आयुष्याचादेखील सुंदर,अभिमानास्पद हिस्सा व्हावा. म्हणून....
*विजय'दीप सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय* आपल्या पाठबळ, आशीर्वाद, पाठिंबा यामुळे सुरुवात करीत आहोत. आपला जिव्हाळा प्रेम,आपुलकी सदा अबाधित राहो.
आपलाच....
कुलदीप देवकुळे

#तुरचीगावात
#संध्याकाळीपाचवाजता
#मंगळवारनोव्हेंबरएकवीस
_________________________________________________________

मास्तर ;
आपल् जीवन सुख ,समृद्धी, आर्थिक भरभराटी युक्त व आरोग्यमय जावो... 

आमचे "लेखनीपुत्र" मित्राच्या
 लेखणीतून 
 आपणाकडे असणाऱ्या या कलेचा सर्व समाजास जगास मार्ग मिळावा. .. आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात .. हीच सदिच्छा व शुभकामना...

मास्तर ;; आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .....

आपला...
सलीमभाई: संपादक; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.