कोयना धरणातून पाणी पाणी सोडू नका असे आदेश दिलेले नाहीत :- नामदार शंभूराजे देसाई.. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

कोयना धरणातून पाणी पाणी सोडू नका असे आदेश दिलेले नाहीत :- नामदार शंभूराजे देसाई.. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची माहिती
लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

कोयना धरणातून पाणी  पाणी सोडू नका असे आदेश दिलेले नाहीत :- नामदार शंभूराजे देसाई.. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची माहिती


नागपूर दिनांक ६ डिसेंबर :- कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील शेती सिंचनासाठीच्या पाणी योजना तसेच पिण्यासाठी पाणी सोडण्यास कोणतीही अडचण नाही ,असे स्पष्टीकरण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी येथे दिले. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यासंदर्भात नामदार देसाई यांच्याशी बुधवारी  फोनवरून याबाबत चर्चा केली. त्यावेळी नामदार देसाई यांनी हे स्पष्टीकरण दिले.नामदार देसाई म्हणाले, कोयना धरणातून सांगली जिल्ह्यातील सिंचन योजना तसेच सांगली शहरासह सर्व शहरांसाठी पिण्यासाठी पाणी सोडण्याबाबत सकारात्मक शासन सकारात्मक आहे.  कोयना धरणातून पाणी सोडू नये अशा स्वरूपाचे कोणतेही आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आलेले नाहीत. तसे आदेश देण्याचे कोणतेही कारण नाही.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कोयना धरणातून विसर्ग थांबणार असल्याच्या एका वृत्ताकडे नामदार देसाई यांचे लक्ष वेधले तेव्हा नामदार देसाई म्हणाले, असे कोणतेही आदेश किंवा सूचना देण्यात आलेल्या नाहीत. सांगली जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना तसेच सांगली शहरासह सर्व शहरांसाठी आवश्यक तो पिण्याचा पाणीपुरवठा करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. याबाबत मी (नामदार देसाई)स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग थांबणार नाही. आवश्यकता भासेल त्याप्रमाणे पुरेसे पाणी सोडण्यात येईल याबाबत कोणीही शंका घेऊ नये.
आमदार गाडगीळ म्हणाले, सांगलीतील आणि सांगली जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या पाणीपुरवठा संदर्भात मी मुख्यमंत्री नामदार शिंदे आणि उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस यांच्याशीही चर्चा करणार आहे. परंतु नामदार देसाई यांनी दिलेले स्पष्टीकरण पुरेसे आहे असे मला वाटते.त्याचबरोबर मी सातत्याने या विषयाकडे अधिक लक्ष देऊन आहे.ज्या ज्या वेळी सांगलीत पाणीपुरवठा आवश्यक असेल त्यावेळी सोडण्याबाबत शासनाबरोबर मी सातत्याने संपर्क ठेवत आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.