महामुंबई "पासून अटल सेतू मार्गे मुंबई फक्त २० मिनिटांत...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महामुंबई "पासून अटल सेतू मार्गे मुंबई फक्त २० मिनिटांत...


लोकसंदेश न्यूज उरण (रायगड)प्रतिनिधी:दिनेश पवार 

"महामुंबई "पासून अटल सेतू मार्गे मुंबई फक्त २० मिनिटांत...

उरण; मुंबई आणि "महामुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा-शेवा चिरले ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे नुकतेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या हस्ते लोकार्पण झाले. या सागरी अटल सेतूने व्यापाऱ्याच्यादृष्टीने महत्त्वाची अशी दोन शहरे अवघ्या २० मिनिटांमध्ये गाठता येणार आहेत. त्यामुळे माल वाहतूकदारांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) गाठणे सोप्पे झाले असल्याने हा सागरी सेतू उपयुक्त ठरणार आहे


‘अटल सेतू’ हा देशातील सर्वात लांब असा सागरी मार्ग आहे. या मार्गामुळे मुंबई ते महामुंबई (जी तिसरी मुंबई होऊ पहात आहे) हा प्रवास काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तसेच पुणे- मुंबई,- गोवा, मुंबई,  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना ही जोडला जाणार आहे. एकंदरीतच राज्याच्या विकासात माल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून ‘अटल सेतू’ ची महत्त्वाची भूमिका महत्वाची व फायद्याची असणार आहे. या सेतूमुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही देशातील अति महत्त्वाची बंदरे जोडली गेली आहेत. या दोन बंदरातून दररोज हजारो कंटेनर गाड्यांद्वारे मालाची वाहतूक होत असते. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये उतरलेला माल हा न्हावा-शेवा बंदर किंवा परिसरातील कंटेनर यार्डामध्ये किंवा गोदामात साठवला जातो. तेथूनच हा माल वितरीत केला जातो. तर जेएनपीटी बंदरातून मोठ्याप्रमाणात मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच उर्वरित महाराष्ट्र व संपूर्ण देशात माल पोहोचवला जातो. यासाठी वाशी खाडीपूल मार्गे वाहतूक केली जात असल्याने प्रक्रियेला किमान दोन दोन दिवस लागत होते. परंतु, अटल सेतूमुळे नवी मुंबई, मुंबईपर्यंतचा मोठा वळसा, वेळ , डिझेल,वाचणार आहे.
--------------------------------------
           बांधकाम व्यवसायाला फायदा

- नवी मुंबई तसेच सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडी तसेच मुंबईत काही ठिकाणच्या अवजड वाहन बंदीतून काही प्रमाणात माल वाहतूकदारांची सुटका होणार आहे. या पुलाचा वापर केल्यास वाहतूक कोंडी, ट्रॅफिक सिग्नल व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे माल वाहतुकीस एकावेळी जवळपास २० किलोमीटरच्या अंतरामुळे ९०० ते एक हजाराचे इंधन वाचणार आहे.

मुंबई व  चिरले परिसरातील 26 गावांमध्ये  डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे व बांधकाम व्यवसाय हा नवी मुंबई परिसरातील माल व साधन संपत्तीवर अवलंबून आहे. न्हावा-शेवा, कळंबोली, तळोजामधून मोठ्या प्रमाणात लोखंडी सळ्या, लोखंड-पोलाद, सिमेंट, खडी, दगड, विटा व इंडस्ट्रिअल साहित्याची वाहतूक अटल सेतू मार्गे कमीत कमी वेळात होणार आहे.
--------------------------------------


                 टोलचा झोल संपला...

टोलच्या रांगेतून सुटका
तळोजा, पाताळगंगा औद्योगिक वसाहत, खोपोली, पनवेल, पुणे व   संपूर्ण महाराष्ट्रातून  ठिकाणाहून मुंबई पोर्ट ट्रस्ट व उर्वरित मुंबईत मोठ्या प्रमाणात माल वाहतूक व प्रवासी दळणवळण होत असते. मुंबई जाण्यासाठी वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा उपयोग होतो. परंतु, खारघर टोल नाक्यावर ट्रेलर ४०० तर ट्रकसाठी १९० तर वाशी टोल नाक्यासाठी १९०, ट्रक १३० जवळपास एवढ्याच पैशात अटल सेतूवरून सुसाट जाता येणार आहे.
--------------------------------------



मुंबईमध्ये जड वाहनांच्या वाहतुकीची अडचण होऊ नये म्हणून जे नियम आहेत त्या नियमातून सुद्धा या अटल सेतूमुळे वाहनधारकांची सुटका होऊन
एका दिवसात मालवाहतूक पोहचवणे शक्य झाले आहे

न्हावा-शेवा, कळंबोली लोखंड पोलाद बाजार, तळोजा औद्योगिक वसाहतीमधून मुंबईसाठी मालवाहक गाडी भरल्यानंतर सायन-पनवेलमधील खारघर पाठोपाठ वाशी येथील टोलनाका, नेरूळ, मानखुर्द शिवाजीनगरची वाहतूक कोंडी तसेच मुंबईतील प्रवेशानंतर असलेल्या विविध मार्गावरील वाहन बंदीमुळे मालाची वाहतूक होण्यास रात्र उजाडत होती. पण अटल सेतूमुळे अवघ्या दोन तासांत वाहतूक होणार आहे.

-------------------------------------




       मुंबई सायन-पनवेलची कोंडी सुटणार

अटल सेतूवर पहिल्या दिवशी जवळपास दहा हजार वाहनांची नोंद झाली आहे. पुढील काळात यात मोठ्याप्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे साहजिकच सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा भार हलका होणार असून दादरपर्यंतची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
-------------------------------------
मुंबई शिवडी-न्हावा-शेवा मार्ग वाहतूक व्यवसायवृद्धीसाठी पोषक आहे. सायन-पनवेल महामार्गावरील रस्त्यावरील खड्डे, कोंडी व टोलवरील रांगेपासून मुक्ती मिळणार असून फेऱ्यात वाढ होऊन वाहतूकदारांचा नफा वाढणार आहे...
संतोष सपकाळ, वाहतूक व्यावसायिक..
-------------------------------------------------
कोणत्याही देशाची प्रगतीत चांगले रस्ते, वाहतूकदारांना सुकर होण्यासाठी असणाऱ्या सुविधा, यामधूनच देशाची प्रगती होत असते ,आणि हेच जाणून मंत्री मा.नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतात रस्त्याचे जाळेविणत योग्यरीत्या नियोजनाने कामे करून भारताच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे...

मुंबई शिवडी व नाव्हा शिवा, चिरले.. अटल सेतू  ज्या भागात जोडला जातो (चिरले ) त्या परिसरातील प्रगती फार मोठ्या प्रमाणात होणार आहे, या ठिकाणी जे.एन.पी.टी. बंदर, दहा किलोमीटर × सहा किलोमीटर क्षेत्रफळाचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे विमानतळ, व आय.टी. पार्क होणार असल्यामुळे, या भागातील  वाहतूकदारांना मुंबईमध्ये जाण्यासाठी जो पनवेल, खाडीपूल ,चेंबूर ,सायन, दादर, भायखळा , व्ही.टी. स जाणारा हा मार्ग आता फक्त वीस मिनिटांवर आल्याने वाहतूकदारांच्या पैशाची डिझेलची व वेळेची ,बचत होणार आहे.. या भागात मोठी प्रगतीचे द्वारे उघडणार आहेत. त्यामुळे चिरले, चिरणेर , खोपटा, इत्यादी,  आसपास उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रगती व विकास होणारच आहे ...या प्रगतीमध्ये स्थानिक नागरिकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे.. तसेच या भागातील शेतकरी,जागा मालक,यांना देखील मोठी संधी निर्माण झाली आहे .

अटल पूलाचे उद्घाटन झाल्यानंतर या भागातील जमिनीचे रेट गगनाला भिडत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी व  महाराष्ट्रीयन लोकांनी येथे आपले व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करावेत व येथील जागा आज "स्वस्तात" मिळत आहेत मात्र उद्या याचे भाव शंभर पटीने वाढणार असल्याने येथे आता  महाराष्ट्रातील लोकांनी जमिनी घ्याव्यात व आपले व्यवसाय वाढवावेत.. ही महाराष्ट्राच्या व्यापाऱ्यांना फार मोठी सू संधी आहे..
एक "ट्रान्सपोर्ट अभ्यासक" म्हणून या अटल सेतूचा वापर करून करोडो ,अब्ज रुपयांची बचत , डिझेलची बचत व वाहनाच्या झीज आणी वेळेची बचत होणार असल्याने वाहनधारकांत आनंदाचे वातावरण आहे..


सलीम नदाफ : सांगली शहर ट्रक, टेम्पो असोसिएशन,सांगली.
संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई /सांगली.
8830247886
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

_______________________________________________________________________________
                             जाहिरात....