मुह मे राम ..... बगल मे छुरी.....
लोकसंदेश न्यूज नेटवर्क
दोन दिवसांपूर्वी एका माजी नगरसेवकाने जो भाजपाच्या मित्रपक्षातील सहयोगी सदस्य आहे त्या माजी नगरसेवकाने सांगलीच्या आमदारांच्या एका निकटवर्तीय कार्यकर्त्याकडून आणि त्याच्या मुलाकडून लाखो रुपयांची टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप केला आहे .
सातत्याने सोज्वळपणा सात्विकता आणि प्रामाणिक चेहरा म्हणून भाजपवाले टेंबा मिरवीत असतात ...
मात्र या नगरसेवकांनी यापूर्वीही त्याच्या पक्षाची सत्ता असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्याकडून फायलीवर कोंबडा मारण्याची भाषा करत असल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांना व पक्षातील नेत्यांना कोंबडा हा जिवंत पक्षी दिला होता मात्र त्यांच्याकडून परत होत असलेल्या या आरोपामुळे लोकांच्या जोरदार चर्चा आहे
या देशात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे नोकऱ्या नाहीत. रोजगार नाही काम नाही अशा स्थितीत सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तरुणी करिअर उभे करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना टक्केवारीची सवय लावणे त्याशिवाय काम न देता कोंडी करणे असे प्रकार सहन करता येणार नाहीत. गणपतरावांनी केलेला सर्जिकल स्ट्राइक कुणाच्या सांगण्यावरून केला होता त्याची जबाबदारी त्यांच्या नेत्यांनी घेतलीच पाहिजे सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांना मिळालेल्या कामात टक्केवारीचा मलिदाखाने हे टाळूवरचे लोणी खाण्यासारखेच आहे. यामुळे भाजपाच्या मित्रपक्षानेच भाजपाचा मूळचा चेहरा बुरखा फाडलेला आहे
संबंधित विभागाचे अधिकारी अत्यंत महत्त्वाची शासकीय कागदपत्रे एका अशासकीय व्यक्तीकडे कसे देत होते याचीही चौकशी झाली पाहिजे तसेच गणपतरावांकडून वसुली केली जात असलेली टक्केवारी नेमकी कोणाकडे जात होते सात टक्क्यात गणपतराव एकटेच वाटेकरी असतील तर त्यांच्याकडून भाजप पद काढून घेणार का??
त्यांची पक्षातून हकालपट्टी करणार का?? हा खरा प्रश्न आहे विशेष म्हणजे वाजपेयींच्या सत्ता काळात या पक्षाचे अध्यक्ष रंगेहात लाच घेताना सापडले होते त्यामुळे भाजपाने राम मंदिरासाठीच्या श्रेयवादासाठी जो काही आटापिटा चालू केलेला आहे तो निरर्थक आहे राम एक वचनी एक पत्नी आणि गोरगरिबांच्या वर न्याय करणारा राजा होता तो कुणाला लुटत नव्हता म्हणूनच देशात रामराज्य आले पाहिजे ...ही एक म्हण पूर्वचलित आहे सोजवळपणाचा टेंबा मिरवणाऱ्यांनी एक तर मागितलेली टक्केवारी मान्य आहे म्हणावे अन्यथा टक्केवारी मागणाऱ्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याला घरचा रस्ता दाखवावा ..."शितावरून भाताची परीक्षा" लोक ओळखून आहेत भाजपाने राम मार्ग सोडून लूट मार्ग अवलंबलेला आहे अशा आशयाचे पत्रक शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.