शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा - जय श्री राम!....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा - जय श्री राम!....        शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा - जय श्री राम!

*आज शेतकऱ्यांची दुरावस्था अब्राहीन लिंकनच्या काळातील गुलाम, कार्ल मार्क्सच्या काळातील कामगार व महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळातील शुद्रांपेक्षा भीषण आहे.*

वर्तमानपत्रातील बातम्यांचे शीर्षक पाहीले की अंदाज येतो की सर्व बाजूने शेतकऱ्यांना किती त्रास होत आहे. व संताप येतो.

मागील महिन्यातील बातम्यांचे खालील शीर्षक पहा. हे फक्त प्रातिनाधिक आहेत.

# संत्रा उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर मोदींना दशक्रिया विधीचे आमंत्रण.

# कापूस दर हमी भावापेक्षा कमी. "पणन" ची कापूस खरेदी रखडलेलीच. तीन वर्षांपासून 101 कोटी रु. थकीत.

# कांद्याला मिळेना उत्पादन खर्च एवढा बाजार भाव. निर्यात बंदीचा फटका 1400 रु कोटी वर. कांद्याच्या शेतात सोडल्या मेंढ्या.

# राज्य शासनाचे धान उत्पादकांचे 242 कोटी रुपयाचे चुकारे थकले.

# केळी उत्पादक विम्या पासून वंचित

# दुधाचा तटपुंजे अनुदानाचा जीआर, जाचक अडथळ्यांची शर्यत

# अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गात आंबा, काजू पिकांचे नुकसान

# स्मार्ट प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये निकषांचा अडसर

# 'महावितरण' कडे अर्ज करूनही मिळेना शेत पंपाना वीज जोड

# कृषी प्रधान महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मध्ये प्रथम क्रमांकावर. दररोज आठ विवाहितांचे पुसले जाते कुंकू.

# आजोबा समोरच नातवाला बिबट्याने ओरबडले. सहा वर्षाच्या बालकाचा मृत्यू. आठ महिन्याच्या चिमुकलीला आईच्या समोर बिबट्याने उचलून ठार केले.

# जलजीवन मिशनमध्ये अलिबाग तालुक्यात प्रशासकीय अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार. 103 योजना पैकी फक्त 7 योजना प्रगतीपथावर.

# 40 तालुक्यातील 1200 महसूल मंडळात दुष्काळग्रस्तांची मदत प्रलंबित

# डाळिंब उत्पादकांचा पाय आणखी खोलात

# बुरशी, जिवाणूजन्य करपा रोगांनी द्राक्ष बागा उध्वस्त

# राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना 'पी एम किसान' ची मदत मिळेना

# अनुउत्पादक भाकड जनावरे सांभाळणे कठीण

# टोमॅटो, घेवडा, काकडी, हिरवी मिरची व फळभाज्यांच्या दरात मोठी घसरण

# खाद्यतेल आयात शुल्क कपातीला वर्षभराची (डिसेंबर 2025 पर्यंत) वाढ. आपल्या सोयाबीन, सूर्यफूलाचे, करडई वगैरे भाव अजून गडगडणार.

#'नाफेड' व 'एनसीसीएफ' यांच्याकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट

# तुषार, ठिबक संचाचे अर्ज 'महाडीबीटी' स्वीकारेना

# फुलांचे दर कोसळले

# कृषी वीज पुरवठा रात्रीचा फक्त चार तास. नादुरुस्त रोहित्रे

# भात कापणी साठी मजूर टंचाई

# पिक कर्ज घेणाऱ्यांच्या मागे सिबिलचा जाच कायम, कर्ज मिळेना

# फवारणी, पॅकिंग, लेबलिंग त्रुटीमुळे शेतकऱ्यांचे मृत्यू व अंधत्व

# यवतमाळ मध्ये विम्याची भरपाई मिळाली दोन रुपये

# मैला व रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे शेतकरी त्रस्त

# परभणी मध्ये 'मर' रोगामुळे हरभऱ्यावर फिरवला ट्रॅक्टर. दुबार पेरणीचा भुर्दंड

# 375 कोटी रुपयाचे कांद्याचे अनुदान नऊ महिन्यानंतर ही रखडलेलेच.

# आता रिंग रोड साठी सक्तीने भूसंपादन

तरी जय श्री राम!.....

लेखक 
सतीश देशमुख, B.E. (Mech.), पुणे                                   अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स
9881495518
एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास!...

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.