लोकसभेत तोंड कधी उघडले का? याचा जनतेसमोर पंचनामा करा. प्रत्येक शिवसैनिकाने मतदार संघात स्वतःला चंद्रहार व्हावं लागेल. कोण काय म्हणाले याकडे लक्ष देऊ नका. महाविकासघडीचा उमेदवार चंद्रहारच. चितपट करण्यासाठी कामाला लागा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसभेत तोंड कधी उघडले का? याचा जनतेसमोर पंचनामा करा. प्रत्येक शिवसैनिकाने मतदार संघात स्वतःला चंद्रहार व्हावं लागेल. कोण काय म्हणाले याकडे लक्ष देऊ नका. महाविकासघडीचा उमेदवार चंद्रहारच. चितपट करण्यासाठी कामाला लागा...


लोकसंदेश न्यूज नेटवर्क

सांगली येथील फल्ले मंगल कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला ..

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली सातारा कोल्हापूर संपर्कप्रमुख प्रा नितीन बानगुडे पाटील सर होते प्रमुख पाहुणे म्हणून सांगली लोकसभेचे संघटक आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता


याप्रसंगी स्वागत करताना जिल्हाप्रमुख संजय बापू विभुते यांनी
स्वागत करतानाच सांगली लोकसभा शिवसेनेला सुटतोय, साहेबांचे स्वागत केले पाहिजे. जाबाबदारी वाढली आहे. प्रत्येकाने दीड महिना राग बाहेर काढा. पक्षाला वेळ द्या. राबा. मशाल घराघरात पोचवा . गद्दाराच्या बुडाखाली आग लावा. ६०० पेक्षा जास्त गावे मतदार संघात. यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे. जो खरा सैनिक आहे त्यादिवशी चंद्रहार पाटील प्रवेश झाला त्यावेळी जलोश साजरा करणे गरजेचे होते.
भाजपचा उमेदवार हरवायचा असेल तर निवडणुकीत ताकदीने उतरणे गरजेचे. निरोपाची वाट न पाहता काम करा. प्रत्येक कार्यकर्र्याने काम करावे. सांगलीचा खासदार आपलाच असेल. चार दिवसात तिकीट जाहीर होईल. संभ्रम जागे बाबत नसावा शिवसेनेलाच सुटलेली आहे. कामाला लागा. यामध्ये किंतु परंतु नाही. हेवेदावे बाजूला ठेवा. सन्मानाने बोलवा. जबाबदारी द्या. समन्वय समिती तयार करा. दुप्पट ताकत मातोश्रीवरून मिळेल. फक्त लढाईची तयारी ठेवा. हक्काचा खासदार दिल्लीत पाठवायचा असेल तर अधिक जोमाने कामाला लागा. असे आवाहन करत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले


सर्व अगीकृत संघटनाही काम करावे. असे आवाहन केले यावेळी जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील गुंठेवारी चळवळीचे चंदन दादा चव्हाण यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली, यावेळी सत्काराला उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी तीन भेटीतच मला सामाजिक संधी दिली आणि माझ्या आणि उद्धव साहेबांच्या मध्ये फक्त मातोश्री आहे त्यांचा विश्वास मी पूर्ण करीन आणि ताकदीने या दिल्लीच्या तक्त्यावर सांगलीचा भगवा झेंडा फडकवण्याचे काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी असे भावनिक आवाहन करतानाच सांगली जिल्ह्यातील विविध प्रश्नाबाबत हात घालताना द्रायपोर्ट, विमानतळ, द्राक्ष संशोधनकेंद्र कुठे आहे.


लोकसभेत तोंड कधी उघडले का याचा जनतेसमोर पंचनामा करा. प्रत्येक शिवसैनिकाने मतदार संघात
स्वतःला चंद्रहार व्हावं लागेल. कोण काय म्हणाले याकडे लक्ष देऊ नका. महाविकासघडीचा उमेदवार चंद्रहारच. चितपट करन्यासाठी कामाला लागा.
पंचायत समिती गट निहाय याद्या काढा. प्रचाराचे नियोजन करा. ही निवडणूक सोपी करायचे असेल तर जबाबदारीने काम करावे लागेल. आचारसंहिता कधीही लागेल. ४५ दिवसात गुलाल घ्यायचा आहे.
याची खून गाठ म्हणायची बांधून कामाला लागा पक्षप्रमुख उद्धवजींचा विश्वास सार्थ करू आणि सांगली वर भगवा फडकवू असा संकल्प मी केला आहे

तुम्हीही यात अग्रभागी सहभागी होऊन तुमच्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवा असे उदगार यावेळी चंद्रहार पाटील यांनी काढले पुढे बोलताना पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले उद्धव साहेबांनी एका शेतकऱ्याच्या सुशिक्षित एम ए झालेल्या मुलावर मुलावर विश्वास दाखविला हे शिवसेनाच करू शकते. राजकीय वरदहस्त नाही. नेता नाही. साखर कारखाना नाही. तरीसुद्धा मला पक्षात संधी दिली याचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. साहेबांनी अगदी निसंकोच पणे विश्वास ठेवला. उमेदवारी घोषित केली. भाळवणी विटा एमएएमफिल शिक्षण घेतले सांगली जिल्ह्याला २८ वर्षांनंतर महाराष्ट्र केसरी आणि ३५ वर्षांनंतर डबल महाराष्ट्र केसरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी खेळलो.
सामाजिक क्षेत्राची आवड आहे. झेडपीत २२ व्यं वर्षी विजयी. झालो ज्या वयात मुलांना हे बघायचं भाग्य मिळत नाही

त्या सभागृहाचा सदस्य म्हणून मतदार संघाला न्याय देता आला भारतातील सर्वात मोठे कुस्ती संकुल ५०० मुलांची व्यवस्था. २०० मुले सराव करतात. सैनिकांना रक्तदान, बैलगाडी शर्यत. कुस्ती आणि बैलगाडी स्पर्धा. लाख जणांचे रक्तदाणाचा संकल्प. आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान सह सामाजिक उपक्रम राबविले. अनेक लोक अनेक वेगवेगळ्या शंका कुशंका उपस्थित करतात त्याबाबत बोलताना पैलवान म्हणाले ठराविक मर्यादेपर्यन्त शांत राहणार. पैलवान आणि शिवसेना आक्रमक पक्ष एकत्र आलीय हे लक्षात घ्या.. असा इशाराच पैलवानणि दिला


यानंतर बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष व सांगली सातारा कोल्हापूर संपर्कप्रमुख उपनेते नितीन बानूगडे पाटील हणाले, डबल महाराष्ट्र केसरी राजकारणाच्या आखाड्यात आला आहे. ठाकरेंच्या तालमीत सहभागी झाले. आपण सागली केसरी होणार. सांगलीत पक्ष मजबूत. मातोश्री वर बैठक झाली ... आणि ठरले सांगलीचा खासदार आपलाच असेल.
चर्चा बैठका सुरू आहेत पण पक्ष प्रमुखांनी संकेत दिले आहेत. शेतीमाल भाव कमी आहेत. सोयाबीन चा आजचा भाव ४५०० आहे. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना ११००० होता दीड लाख बुडवायचे आणि दोन हजार द्यायचे असा कार्यक्रम सुरू आहे. बेरोजगारी आहे. तरुणांचे प्रश्न आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील युवक नोकरी साठी बाहेर जातात. रोजगाराचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

               "मोदी की गॅरंटी"

जाहिराती सुरू आहेत. ५०० ते ६०० कोटीं रोज खर्च सुरू आहे. उत्तम काम असत तर जाहिरात करण्याची गरज नव्हती. पक्ष पळवून नेण्याचे काम सुरू आहे. लोकशाहीचे रक्षण करायचे आहे. ठाकरे राज्यात फिरत आहेत. शिवसेना आक्रमक आहे. चंद्रहार ही आक्रमक जनता परिवर्तनाच्या मूड मध्ये आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. तसेच लोकांनी ठरवलेले आहे महाविकास आघाडीचा खासदार झालाच पाहिजे या ध्येयाने कामाला लागा. तळागाळात पोहचणे गरजेचे आहे. मतदार यादीच अभ्यास करा. प्रत्येक मतदारांपर्यन्त पोहोचा. चंद्रहार कोरी पाटी. राजकारणात सावलीवर विश्वस ठेवायचा नाही.
 मतदाराला  संपर्क वाढवा. दोन महिने पक्षासाठी द्या. चूक करू नका. पूर्ण ताकदीने मैदानात उतरा. परिवर्तन
महाविकास आघाडीत उत्तम समन्वय आहे. विधानसभा संघ निहाय बैठका घ्या. वार रूम तयार करा. पूर्तता केली केली जाईल. वेळ कमी, काम जास्त आहे. मायक्रो प्लॅनिंग करू. जबदर्यांचे योग्य वाटप करा.विजयाचा भगवा फडकविणारच आहोत. संकेत दिले आहेत. आता कृती करायाची वेळ  आलेली आहे पर्रीवर्तनाची सुरवात सांगली जिहयातूनच करू  उठा सजवा आणि ही निवडणूक जिंकेपर्यंत लढायची आहे असे आवाहन यावेळी बानगुडे पाटील यांनी केले आभार शिवसेना उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी मांडले यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख निवड झाल्याबद्दल प्रदीप माने पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला  जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख शहर प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी अल्पसंख्याक सेल गुंठेवारी समिती चे प्रमुख कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.