सातारा: खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा, रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेकडूंन खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन,

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सातारा: खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा, रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेकडूंन खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन,




लोकसंदेश न्यूज सातारा प्रतिनिधी
ओमकार पोतदार 

सातारा: खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तात्काळ बंद करा, रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेकडूंन खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन,  

 खंडाळा  पोलीस स्टेशनच्या इतिहासात आजपर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी काम पाहिले आहे. तसेच मागील काही दिवसांपूर्वीच खंडाळा  पोलीस ठाण्याला नूतन प्रभारी अधिकारी सुनील शेळके यांनी खंडाळा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक सुनील शेळके हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.  मात्र पोलीस ठाण्याच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कार्यकाळापासून   राजरोसपणे चालणारे अवैध धंदे यामध्ये जुगार मटका व्यवसाय तसेच ऑनलाइन फन  गेम सूरच असल्यांचे दिसुन येते आहे. त्यामुळे अनेकांचे कुटुंब देशोधडीला  लागले आहेत. या अवैध्य  जुगार ,मटका , फन गेम , अवैध्य दारू व्यवसाय चालविणारे उदाहरणार्थ क्यू बेल्ट कंपनीच्या नजीकच आणि कृष्णा ढाब्याच्या पाठीमागे सुरू असलेला अवैध्य दारू  व्यवसाय करणारे आणि त्यांच्या  एजंट लोकांना कायद्याची कसलीच भीती नसल्यांचे दिसुन येते आहे.
 *व्हॉइस अँकर* जुगार मटका खेळण्याचे व्यसन लागून अनेक कुटुंबांचे संसारिक आयुष्य उध्वस्त झाले आहे . अनेक तरुणांनी आपले आयुष्य यामध्ये बरबाद केले आहे. मटक्याची उधारी भागवण्या साठी काही तरुण चोऱ्या माऱ्या करत आहेत. आपल्या पोलीस स्टेशन मधील पोलीस हवालदार हप्ते गोळा करत असल्याची चर्चा खंडाळा परिसरांत  चालू आहे. हे सर्व थांबण्यासाठी आम्ही आपणांस  विनंती करतो की हे मटका व जुगार व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून हे व्यवसाय कायम स्वरुपी बंद करावेत . हे व्यवसाय  जर कायम स्वरुपी बंद करुन हप्ते गोळा करणाऱ्या आपल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी नाहीत. तर रिपब्लिकन पार्टीं ऑफ इंडिया पक्षाच्या  वतीने सर्व पक्ष कार्यकर्ते यांना सोबत घेवुन मोठे आंदोलन करू याची आपण नोंद घ्यावी. त्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे यांच्यासह आदीं कार्यकर्त्यांच्या उपस्थिंतीत खंडाळा पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.


__________________________________________________________________

बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा.ली.व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई. संपर्क:8830247886







__________________________________________________________________