लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 15 मधील नगरसेवक फिरोज पठाण यांची 100 फुटी रस्त्या ंच्या चौकामध्ये डिव्हायडर मध्ये वाहतुकीसाठी जागा सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे साकडे ..
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली बरीच वर्ष दुर्लक्षित असणारा शंभर फुटी रोड आता पूर्णत्वाकडे जात आहे .. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होऊन रस्त्यामध्ये सिमेंटचे डिव्हायडर बसवण्याचे काम सुरू आहे.. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिवस्ती असल्यामुळे रस्त्याच्या समोरासमोर आपल्या जीवनमानाच्या खरेदीसाठी, आजूबाजूला जाण्यासाठी काही ठिकाणी, धार्मिक कार्यासाठी मंदिर, देऊळ, मशिदींना , व इतर वाहनांना जाण्यासाठी बऱ्याच लांब पल्यावरून नागरिकांना या डिव्हायडरमुळे वळसा घालावा लागणार आहे
जेथे जेथे लहान लहान रस्ते शंभर फुटीला जोडले जातात तिथे तिथे महापालिकेने डिव्हायडर न टाकता रस्ता मोकळा ठेवावा..
अशी मागणी या भागातील नगरसेवक फिरोज पठाण यांनी माननिय जिल्हाधिकारी व माननीय आयुक्त यांच्याकडे अर्जाद्वारे केलेली आहे..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.
________________________________________________________
बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा.ली.व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई.
संपर्क:8830247886
________________________________________________________________