लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024: 44- सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी... 20 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024: 44- सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी... 20 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल


लोकसंदेश न्यूज नेटवर्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
44- सांगली लोकसभा मतदार संघात
नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी...
20 उमेदवारांची 22 नामनिर्देशन पत्रे दाखल


सांगली दि. 19  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी 22 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. आजअखेर एकूण 30 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. या नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 20 एप्रिल 2024 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल आहे.

 

    दिनांक 19 एप्रिल रोजी दाखल झालेली                        नामनिर्देशनपत्रे पुढीलप्रमाणे.


(1)      सुरेश तुकाराम टेंगळे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.
(2)     जालिंदर मच्छिंद्र ठोमके यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(3)     धनंजय हरी गाडगीळ यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(4)    बाजीराव शंकर गवळी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(5)    चंद्रहार सुभाष पाटील यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(6)     दिव्या चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(7)    दत्तात्रय पंडित पाटील यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(8)    प्रकाश शिवाजीराव शेंडगे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(9)     रेणूका प्रकाश शेंडगे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(10)  दिगंबर गणपत जाधव यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(11)  महेश यशवंत खराडे यांनी स्वाभिमानी पक्षा तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(12) बापू तानाजी सुर्यवंशी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(13)  टिपू सूलतान सिकंदर पटवेगार यांनी बहुजन समाज पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(14) प्रतिक प्रकाशबापू पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(15) विशाल प्रकाशराव पाटील यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(16) स्मिता शितल यादव यांनी इंन्सानियत पार्टी तर्फे एक नामनिर्देशन पत्र दाखल केले.


(17)  अल्लाउद्दीन हयातचाँद काजी यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

(18)  रविंद्र चंदर सोलनकर यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.(19)  महेशकुमार कांबळे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(20) तोहीद इलाही मोमीन यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

____________________________________________________


आता 124 गावांची तिसरी मुंबई..... अटल सेतूजवळ 124 गावांमध्ये नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना आता वेग येत आहे ....
आता 124 गावांची तिसरी मुंबई.....

 अटल सेतूजवळ  124 गावांमध्ये नवीन शहर वसवण्याचा प्रयत्नांना आता वेग येत आहे ....

तिसरी मुंबई उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून सिडकोचे विशेष प्राधिकरणाचे अधिकार रद्द करण्यात आल्याने एम.एम आर.डी ए.कडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरातील लोकसंख्या वाढत आहे या लोकसंख्येचे वाढीमध्ये वाहतुकीची पण  समस्या निर्माण झाली आहे.. आणि याचा विचार करूनच राज्य शासन महाराष्ट्रात तिसरी मुंबई उभारण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य सरकारने आता या प्रकल्पाला मंजुरी दिली असून अटल सेतू चिरले गावापासून जवळ तब्बल 124 गावांची मिळून तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. तिसरी मुंबई उभारण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. एम.एम.आर.डी ए.द्वारे रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. याचे चेअरमन दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. 
तिसऱ्या मुंबईसाठी नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील (नैना) 80 व खोपटा नवनगर अधिसूचित क्षेत्रातील 33 गावांसाठी सिडकोची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, आता ती नेमणूक रद्द करत ही जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली आहे. तिसऱ्या मुंबईसाठी तब्बल 124 गावांतील जमीन राज्य सरकार एम.एम.आर.डी.ए.द्वारे संपादीत करुन सिडकोच्या धर्तीवर संपादित करणार आहे.124 गावांचा समावेश

अटल सेतूच्या पलीकडे एमएमआरडीएच्या माध्यमातून एनटीडीएअंतर्गंत  (New Town Development Authority - NTDA) 

124 गावांच्या विकासासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. न्हावा शिवडी सी लिंक अर्थात एम.टी.एच.एल.च्या पलीकडे 124 गावांच्या परिसरातील 323 चौरस कि.मी. क्षेत्रात तिसरी मुंबई वसवण्यात येणार आहे. यासाठी सिडको संचालक मंडळाने नैना क्षेत्रातील 80 गावे वगळण्यास मान्यता दिली आहे. त्यापाठोपाठ एम.एम.आर.डी.ए.नेही तिसऱ्या मुंबईचे क्षेत्र एम.टी.डी.एअंतर्गंत विकसित करण्यास मंजुरी दिली आहे.          सर्व सुविधा हायटेक असणार....

तिसरी मुंबई पनवेल, उरण दरम्यान उभारण्यात येणार आहे. पनवेल, उरण तालुक्यातील या गावांचा झपाट्याने विकास होणार आहे. तर, या परिसरातही अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे. मुंबई-नवी मुंबई प्रमाणेच तिसऱ्या मुंबईचाही विकास करण्यात येणार आहे. तिसरी मुंबईत व्यावसायिक संकुले, शाळा, रुग्णालय, मैदान यासारख्या अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत.


तिसऱ्या मुंबईला जोडण्यासाठी रिंग रोड ची सुविधा....

तिसऱ्या मुंबईला नवी मुंबई-मुंबईला जोडण्यासाठी रिंग रोडदेखील उभारण्यात येणार आहे. तिसरी मुंबई हा नवी मुंबई व मुंबईचा मध्य भाग आहे नवी मुंबई विमानतळाच्या लगतच हा नवीन प्रकल्प असणार आहे. हैदराबाद आणि अहमदाबाद शहराच्या धर्तीवर एक एक्सेस कंट्रोल रिंग रोड निर्माण केला जाणार आहे.

            महाराष्ट्रीयन लोकांनी लाभ घ्यावा....


मुंबई शिवडी व्ही.टी.पासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या
 भागाचा विकास निश्चित आहे.. या भागात जास्तीत जास्त  महाराष्ट्रातील लोकांनी आपली गुंतवणूक करून येणाऱ्या सुसंधीचा फायदा घ्यावा.. हा भाग निश्चित विकसित होणारच आहे.. महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी यामध्ये आपली गुंतवणूक करावी ...या भागातील जमिनी आज देखील स्वस्त  सर्वसामान्य ,मध्यमवर्गासाठी परवडणाऱ्या दरामध्ये मिळत आहेत.. त्या खरेदी करून आपल्या भविष्याची गुरुकील्ली निर्माण करावी...
अशी सुसंधी परत मिळणे शक्य नाही..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली...

________________________________________________________
_______________________________________'___________'''''_''''__________________________________
बातमीच्या या भागाचे प्रायोजक आहेत..
निसर्गभूमी डेव्हलपर्स प्रा.ली.व ईस्टेट 99 इंडिया, मुंबई.
संपर्क:8830247886__________________________________________________________________