जैन कासार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दक्षिण भारत जैन सभा कार्यालयास सदिच्छा भेट.... एकमेकांच्या सहयोगातून समाजाचा विकास साधु या :... रावसाहेब जि.पाटील*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

जैन कासार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दक्षिण भारत जैन सभा कार्यालयास सदिच्छा भेट.... एकमेकांच्या सहयोगातून समाजाचा विकास साधु या :... रावसाहेब जि.पाटील*


लोकसंदेश न्यूज नेटवर्क 

जैन कासार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची दक्षिण भारत जैन सभा कार्यालयास सदिच्छा भेट....
एकमेकांच्या सहयोगातून समाजाचा विकास साधु या :... रावसाहेब जि.पाटील..

सांगली : जैन समाजामध्ये अनेक पोटजाती असल्यातरी आपण सर्वजण एकच आहोत आणि एकत्र येण्याची आता काळाची गरज बनली आहे. सभेचे जैन कासार संस्थेला सदैव मार्गदर्शन व सहकार्य राहील. जैन समाजाची प्रातिनिधीक संस्था असलेल्या द.भा.जैन सभेमध्ये सर्व दिगंबर जैन पोटजातीतील कार्यकत्यांनी आपले योगदान दिले आहे. समान उद्दिष्टांवर या दोन्ही संस्थांची स्थापना झाली असल्याने एकमेकांच्या सहकार्याने आपण समाजोन्नतीसाठी कार्यरत राहूया अशी भावना व्यक्त करून जैन कासार संस्थेच्या समाजोपयोगी कार्याला शुभेच्छा दिल्या.
जैन कासार संस्थेचे संस्थापक पोपटलाल डोर्ले, अध्यक्ष श्री. विजयआण्णा आप्पा कासार, केंद्रीय उपाध्यक्ष प्रकाश मांगले, मुंबई, महिला कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रभा मांगले, कार्याध्यक्ष महावीर दुरूगकर व सदस्यांनी सभेच्या कार्यालयाला भेट देवून सभेच्या एकूण कार्यपद्धतीविषयी माहीती करून घेतली. सभेच्यावतीने जैन कासार संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. 
मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये द.भा.जैन सभेच्या स्थापनेपासूनचा आजपर्यंतच्या एकूण कार्याचा आढावा घेतला. सभा, तिचे विभाग आणि शाखांची कार्यपद्धती, पदाधिकारी निवड, अधिवेशने, विविध फंड, शिष्यवृत्ती वितरण, पाठशाळा आदिबाबत विस्तृत माहिती देवून अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या विविध प्रभावी उपक्रमांची माहिती सांगितली. विजय कासार हे सभेचे आधारस्तंभाप्रमाणे आमच्या पाठिशी असल्याचे नमूद केले. 
जैन कासार संस्थेचे अध्यक्ष विजय कासार यांनी जैन कासार संस्थेच्या स्थापनेपासून आजअखेरच्या कार्याचा आढावा घेतला. आपण सांगली जैन बोर्डिंगचे माजी विद्यार्थी असून सभेच्या शिष्यवृत्तीमुळेच माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. दक्षिण भारत जैन सभेमुळेच समाजासेवेचे बाळकडू मला मिळाले. तन,मन,धनाने मी सभेला आजपर्यंत मदत केली आहे आणि पुढेही करीत राहणार असून सभा ही पितृसंस्थासमान असून तिच्याच प्रेरणेनेच जैन कासार संस्थेच्या स्थापनेची कल्पना प्रत्यक्षात आल्याचे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. सभेच्या ‌‘प्रगति आणि जिनविजय' च्या धर्तीवर ‌‘जैन कासार समाचार' पत्रिका चालू केल्याचे सांगितले.
जैन कासार संस्थेच्यावतीने जैन कासर संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. महावीर दुरूगकर यांनी तर द.भा.जैन सभेच्यावतीने सी.ई.ओ. योगेश खोत यांनी आभार मानले. या सदिच्छा भेटीवेळी उदय लेंगडे, मोतीलाल वणकुद्रे, अभिजीत मांगले, महावीर भिवरे, विनोद मांगले, प्राचार्य अशोक साळवी, महावीर मांगले, प्रा.धन्यकुमार बिराजदार, ॲड. सौ. नीता मंकणी, डॉ. अभयकुमार गुंगे आदि मान्यवर उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.