लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली शंभर फुटी रोड, भोबे गटार स्वच्छतेची मोहीम अंतिम टप्प्यात...
दोन दिवसात ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा उठाव केला -- वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक : युनूस बारगिर
पावसाळी पूर्व नाले सफाई ,स्वच्छता मोहीम म्हणून मा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त वैभव साबळे , डॉ रवींद्र ताटे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका क्षेत्रात कार्यरत आहे,
सांगली मिरज कुपवाड महापालिका कार्यक्षेत्रात सांगली येथील शंभर फुटी रोड भोबे मोठी गटार स्वच्छतेची मोहीम दिनांक ८/५/२०२४ रोजी पासून आज अखेर सुरू करण्यात आली आहे .
सदरची गटार ही शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावली असते , स्वच्छता आणि प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग यांनी सदरची गटार स्वच्छता करण्यासाठी नियोजन केले आहे.
या कामी महापालिका प्रशासनाने तीन जीसीबी व पाच डंपर द्वारे एकूण ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा उठाव केला आहे.
या कामी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर , जिजाराम मोरे प्र स्वच्छता निरीक्षक व इसराइल मुकादम ,सफाई कामगार यांनी कामगिरी बजावली आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.