लोकसंदेश न्यूज नेटवर्क
जी ए कॉलेजच्या विद्यार्थ्यांची कर्मवीर पतसंस्थेला भेट...
सांगली येथील जी ए कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर नागरी सहकारी पत संस्थेला भेट देऊन बँकींग कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांनी पत संस्थेला भेट दिली या प्रसंगी पत संस्थेचे सी ए धीरज देशपांडे यांनी संस्थेच्या सर्व विभागांची विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रशासकीय कामकाज हे विभागीय व्यवस्थापक, शाखाधिकारी आणि कर्मचारी यांच्या माध्यमातून व्यवस्थापन केले जात असल्याचे सांगितले.
या वेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांनी स्वागत व प्रास्तविकामध्ये विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कर्मवीर आण्णांनी ज्ञानगंगा महाराष्ट्रात घरोघरी पोहचवली, तसेच आर्थिक क्षेत्रात कर्मवीर पत संस्था चांगल्या प्रकारे कार्य करीत आहे. उद्योग, व्यवसाय आणि कृषी क्षेत्रासाठी या संस्थेने भरीव आर्थिक मदत करीत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी कॉलेजचे ज्युनीअर विभाग प्रमुख प्रा राहुल चौगुले यांनी काॕलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन, पत संस्था भेटीत विद्यार्थ्यांना जास्ती जास्त माहिती संकलित करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
त्या नंतर सी ए धीरज देशपांडे यांनी सहकार विभाग, आरबीआय इत्यादी पासून संस्थेच्या ठेवी, कर्जे, भाग भांडवल, सभासद, संचालक मंडळ, मिटींग, लेखापरिक्षण, इतर सोयी सुविधा इत्यादींचे विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना सांगितले. शेवटी प्रा एम डी सावळगी यांनी आभार मानले. कर्मवीर पत संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी ही संधी उपलब्ध करुन दिल्याने त्यांच्या बद्दल विशेष आभार व्यक्त केले. तसेच या भेटीसाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ एस् एस् शेजाळ यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी काॕलेज मधील प्रा सौ पी ए कुंभोजकर, प्रा सौ वाय एस् चौगुले, पत संस्थेचे श्री सासणे यांच्या सह स्टाफ आणि जी ए कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.