..क.भा.पा. विद्यालयातील श्री एम.पी.सोनवणे सरांना WHC संघटनेतर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार...
लोकसंदेश न्यूज नाशिक प्रतिनिधी : सौ.सुनीता पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,साकोरे येथे गुरुवार दिनांक 19/09/2024 रोजी शाळेतील नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड मा . श्री भगीरथजी शिंदे साहेब ,इमारत उद्घाटन शुभहस्ते माजी खासदार, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा .श्री राम शेठजी ठाकूर साहेब ,प्रमुख उपस्थिती उत्तर विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी मा .बोडखे साहेब ,सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब ,वडजे बापू , जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा श्री .रमेश उग्रसेन बोरसे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीषभाऊ बोरसे ,विद्यालयाच्या प्राचार्या सौ. जगताप मॅडम या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन इमारतीचे उद्घाटन झाले .या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे गणित, विज्ञान विषयाचे शिक्षक श्री सोनवणे एम. पी.(सर) यांना World Humanity Commission (USA ) या संघटनेमार्फत राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते सरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ , शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सरांचे अभिनंदन केले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.