युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्या 14 गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यास तत्वता मान्यता, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्या 14 गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यास तत्वता मान्यता, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

LOKSANDESH NEWS 

युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्या 14 गावांना खडकपूर धरणातून पाणी देण्यास तत्वता मान्यता, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

 खडकपूर्णा धरणातून 14 गावांना डाव्या कालव्याद्वारे पाणी मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन, 

उपोषण करून देखील दखल घेतली जात नसल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेल्या कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून तीन दिवसांपूर्वी आपले जीवन संपवले.

 आज त्यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावत स्वर्गीय कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. 

दरम्यान कैलास नागरे यांच्या मागणीनुसार परिसरातील 14 गावांना खडकपूर्णा धरणातून शेतीला पाणी देण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे. सोबतच कैलास नागरे यांच्या मुलांचे पालकत्व ही त्यांनी स्वीकारले आहे.

 शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेतला जातो, ही शोकांतिका म्हणावी लागेल.

 हा निर्णय सरकारने आधी घेतला असता तर या युवा शेतकऱ्यांचा जीव वाचला असता, अशा भावना समाजातून व्यक्त होत आहेत.

लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली