LOKSANDESH NEWS
अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेने रोखली, 6 लाख 33 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका चार चाकी वाहनातून बेकायदेशीर रित्या विदेशी दारू आणि बियर ची मालेगाव कडून नवापूरच्या दिशेने अवैध्यरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मालेगाव धुळे महामार्गांवर सापळा रचून संशयित वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्यांनी तपासणी केली असता त्यामध्ये लाखो रुपयांचा विदेशी दारू आणि बियरचा साठा मिळून आला.
पोलिसांनी वाहनासह जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल 6 लाख ते 33 हजार 325 रुपये इतकी असून याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून आम्हाला त्यांनी कुठून आणला होता व तो कुठे नेत होते याचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली