LOKSANDESH NEWS
बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, आरपीआय आठवले गटाची मागणी
बिहार मधील बुद्धगया महाबोधी विहार हे तथागत भगवान गौतम बुद्धांचे ज्ञानप्राप्ती स्थळ आहे.महाबोधी विहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र स्थान आहे या पवित्र स्थानावर संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे
त्यासाठीच देशभरात अखिल भारतीय बौद्ध महासभा, तसेच भिक्खू संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली