किसन नगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार होलिका मातेला नैवेद्य दाखवून केले होळी दहन
ठाणे शहरातील किसन नगर येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या.
होळीमध्ये दुःख, निराशा, नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, निरोगी आरोग्य, शांती व सकारात्मक उर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.
तसेच पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहीत होळी साजरी करावी अशा जनतेलाही शुभेच्छा दिल्या.
यासमयी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच किसन नगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.