LOKSANDESH NEWS
| वाल्हे येथील विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील केरकचरा एकत्र करुन केली पर्यावरण पूरक होळी
- पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केरकचरा जाळून पर्यावरणपूरक होळी साजरी केलीय.
विद्यार्थ्यांनी कचऱ्याची होळी पेटवुन समाजासमोर आदर्श ठेवलाय. तसेच केमीकलयुक्त रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठीची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतलीय.
पर्यावरण वाचवा संदेश देण्यासाठी वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूवारी विद्यालयाच्या परिसरातील कचरा संकलित करुन शाळेच्या आवारात कचरा जाळुन पर्यावरणपूरक होळी विद्यार्थ्यांनी साजरी करुन समाजासमोर आदर्श निर्माण केलाय.
कल्पकतेने रचलेला कचरा, गोवऱ्या, विविध प्रकारची फुले, सभोवती रंगीबेरंगी रांगोळी, पुजा व होळी पेटल्यानंतरचा जल्लोष अशा उत्साही वातावरणात होळी साजरी झाली.