राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाली आहे - जयश्री शेळके

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाली आहे - जयश्री शेळके

                                                                LOKSANDESH NEWS 

                         राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाली आहे - जयश्री शेळके




ON कर्ज मुक्ती

- राज्यातल्या जनतेची खूप मोठी फसवणूक झाल्याची भावना सगळ्या जनतेची झालेली आहे. निवडणुकीपूर्वी शेतकरी बांधवांना यांनी आश्वासन दिले की, आम्ही कर्जमाफी करू. चार-चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चार-चार वेळा सांगितलं की, शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू. दुर्दैव राज्याचं आहे की, आज या राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात की आम्ही कर्ज मुक्ती करू शकत नाही. तुम्ही 31 मार्चपर्यंत कर्ज भरा, असं सांगितलं जातंय. या राज्यातल्या सगळ्या मतदारांना आपली फसवणूक झाल्याची भावना आहे. अजब सरकारचा गजब कारभार हा आहे.

 या शेतकरी बांधवांना आज खऱ्या अर्थाने जाणीव झाली असेल की, आम्ही ज्या लोकांना मत दिले ते दुर्दैवाने केवळ त्यांच्या आश्वासन फोल ठरली. आणि ते लोक असे सांगतात तसा हा जुमले बाजीचा प्रकार आहे


ONलाडकी बहीण योजना

- लडकी बहीण योजना निवडणुकीपूर्वी महिलांची मत मिळवण्यासाठी आणली. आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांची मत मिळून एवढाच एक उद्देश हा राज्य सरकारचा महायुती सरकारचा होता. ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की, 2100 रुपये देऊ आणि आता सांगताहेत की, ज्यांना आधी दुसऱ्या योजनांचा लाभ मिळत असेल त्यांना फक्त पाचशे रुपये दिले जातील. आज जवळपास 40 लाखांहून अधिक महिला या लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. 

हा आकडा अजूनही वाढणार. आता बहिणींना लक्षात आलेलं आहे की, या भावांनी कशा पद्धतीने खोटं बोलून यांची मत मिळवली. आता जी ओवाळणी ताटात टाकलेली होती ती ओवाळणी सुद्धा काढून घेण्याचं काम..  पाप हे महायुतीचे सरकार करत आहे. हे पाप कुठेतरी फेडावे लागेल



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली