परभणी जिल्ह्यासाठी नवीन 80 बसेस मिळणार, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती
कर्जमाफी होईल म्हणून शेतकरी पीक कर्ज भरत नाही आणि त्यामुळेच त्यांचे सिबिल खराब होत आहे म्हणून अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे असे आवाहन केले असेल.
महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या संपूर्णपणे पाठीशी आहे. शेतकरी सन्मान योजना असो किंवा शेतकऱ्यांना सोलार लाईट असो ही या महायुती सरकारने दिली आहे.
सोलर पंपाला तर देशामध्ये पोलीस सबसिडी दिली नाही. पण हे महाराष्ट्र सरकार देत आहे. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या योजनेमार्फत शेतकऱ्यांचा फायदाच केला गेला आहे. शाश्वत शेती करता यावी म्हणून वेगवेगळ्या योजना या सरकारने आणले आहेत.
परभणी जिल्ह्यासाठी नवीन 80 बसेस मिळणार आहेत. त्यापैंकी काही बसेस सध्या परभणी आगाराला प्राप्त झाल्या आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक बसेस देखील परभणी जिल्ह्याला मिळणार असल्याचे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.
लाडक्या बहिणी विषयी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण लाडक्या बहिणींवर कसल्याही प्रकारचा अन्याय केला जाणार नाही. त्यामध्ये कुठेही खंड पडणार नसल्याचेही मेघन बोर्डीकर म्हणाल्या आहेत.