LOKSANDESH NEWS
पाटबंधारे विभागाच्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग, कालव्यातील पाणी शुभम नगर परिसरात आल्याने नागरिक त्रस्त
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरातील शुभम नगर येथे पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्ष केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरवर्षी कालव्यातून जाणार पाणी हे आमगाव शहरातील शुभम नगर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत जाते.
या भागात राहणाऱ्या नागरिकांना आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणि इतर रोग पसरण्याची भीती यामुळे व्यक्त केली जाते.
परंतु याकडे दरवर्षी पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी आता तरी पाटबंधारे विभागाचे लक्ष जाऊन लाखो लिटर होणारा पाण्याचा अपव्य कशाप्रकारे थांबेल याची उपाययोजना आता पाटबंधारे विभाग करेल अशी अपेक्षा आता नागरिक व्यक्त करत आहेत.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली