LOKSANDESH NEWS
गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचे नुकसान
हदगाव तालुक्यातील मौजे तळेगाव येथे अचानक शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतातील गोठ्यामध्ये जनावर असताना अचानक जनावरांच्या गोठ्याला आग लागल्यामुळे यामध्ये सुमारे चार जनावरे जळाल्यामुळे जखमी झाले आहेत
. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे शेतातील उपयोगी साहित्य जळाल्याने शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.
आज तळेगाव येथे सध्याचे तलाठी यांनी जळालेल्या गोठ्याचा व इतर साहित्यांचा शेतकऱ्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.